Dry Fruits in Summer : उन्हाळ्यात अशा प्रकारे करा ड्राय फ्रूट्सचे सेवन, मिळतील अनेक फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dry Fruits in Summer : ड्राय फ्रुट्सला उर्जेचे पॉवर हाउस म्हटले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांपासून ते फायबर, पोटॅशियम आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. लोकं हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात ड्राय फ्रुट्सचे सेवन करतात. लोकांचा असा विश्वास आहे, की ड्राय फ्रुट्सचा स्वभाव गरम असतो म्हणूनच शरीर गरम राहते. पण उन्हाळ्यात आपण ड्रायफ्रूट्सचे सेवन करू शकतो का? असा प्रश्न सर्व लोकांच्या मनात येत असतो, आज आपण त्याविषयीच बोलणार आहोत.

खरं तर उन्हाळ्यात देखील आपण ड्रायफ्रूट्सचे सेवन करू शकतो. आज आपण अशा ड्रायफ्रूट्सबद्दल जाणून घेणार आहोत. जे तुम्ही उन्हळ्यात बिनदिक्कत सेवन करू शकता.

मनुका

मनुका फक्त हिवाळ्यातच खावा असा गैरसमज अनेकांचा असतो. तुम्ही ते कधीही खाऊ शकता. हा ऊर्जेचा उत्कृष्ट स्रोत आहे. जर तुम्ही उन्हाळ्यात ते खात असाल तर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत खा. कोरड्या मनुका पेक्षा ओले मनुके आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात.

अंजीर

उन्हाळ्याच्या हंगामात देखील तुम्ही अंजीरला तुमच्या आहाराचा एक भाग बनवू शकता. यासाठी रात्रभर अंजीर पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी चावून खावे. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होणार नाही आणि अनेक हार्मोनल समस्यांपासून तुमचे रक्षण करण्यात मदत होईल.

बदाम

बदाम हे देखील एक ड्राय फ्रूट आहे जे लोक उन्हाळ्यात खाण्यास कचरतात. याचे कारण असे की त्याच्या गरम स्वभावामुळे चेहऱ्यावर फोड येऊ शकतात. अशा स्थितीत, जर तुम्ही त्यांना रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यास तुम्हाला पिंपल्सची समस्या तर दूर होईलच पण मेंदूचे आरोग्यही राखता येईल.

खजूर

उन्हाळ्यात खजूर खाण्याची भीती बाळगू नये. यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले खजूर खाल्ल्याने तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहता याशिवाय पचनक्रियाही सुधारते.