कोरोना:मृत्यूआधी ‘त्याने’ पत्नीसाठी लिहिले काळीज पिळवटून टाकणारे पत्र

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

कोरोना आजाराने मृत्यू होण्याआधी, एका 32 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीला आणि मुलांना एक काळीज पिळवटून टाकणारे पत्र लिहिले होते. या युवकाच्या मृत्यूनंतर जेव्हा पत्नी पतीचे सामान चेक करत होती तेव्हा तिला मोबाइल फोनमध्ये त्याने लिहिलेली चिठ्ठी मिळाली.

या चिठ्ठीमध्ये त्याने लिहिले होते, ‘मी तुम्हा सर्वांवर मनापासून प्रेम करतो. तू मला उत्तम आयुष्य दिलेस मी खूप भाग्यवान आहे आणि मला अभिमान आहे की मी तुझा पती आणि ब्रेडिन-पेनीचा पिता आहे.

केटी, मी आजवर ज्यांना भेटलो त्या सर्वांमध्ये तू सर्वात सुंदर आणि काळजी घेणारी व्यक्ती आहेस. तुम्ही तुमचे आयुष्य आनंदाने व त्याच भावनेने जागा कि जे पाहून मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. ही घटना अमेरिकेतील कनेक्टिकटच्या डैनबरी मधील आहे.

महिनाभर कोरोनाशी झुंज दिल्यानंतर जॉन कोएल्हो यांचे 22 एप्रिल रोजी निधन झाले. जॉन स्थानिक न्यायालयात काम करत होते

अहमदनगर लाईव्ह 24