अहमदनगर Live24 :- चीनमध्ये कोरोना आजारापूसन निरोगी झालेल्या रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
त्याचप्रमाणे बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर दक्षिण कोरियाने यामागच्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
प्राथमिक चाचण्यांच्या अहवालातून विषाणूंचे काही अवशेष शरीरात राहत असल्यामुळे रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह येत आहेत. यापैकी अनेक चाचण्यांमधून त्यांच्या शरीरात विषाणू नसल्याचा अहवाल आला होता. दक्षिण कोरियात जवळपास ७,८२९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यातले किमान २.१ टक्के पुन्हा पॉझिटिव्ह दिसले.
काहींमध्ये हलकीशी लक्षणे दिसली. याबाबत कोरिया सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन (केसीडीसी)चे उपसंचालक क्वान जून-वूक यांनी सांगितले की, कोरोना विषाणूबद्दल अजून शास्त्रज्ञांना खूपशी माहिती मिळालेली नाही. अनेकांमध्ये आजाराची लक्षणे पुन्हा दिसत आहेत.
पीपल्स डेलीच्या हेल्थ जर्नल लाइफ टाईम्सनेही दावा केला आहे की वुहानमध्ये बरे झालेल्या कोरोना रूग्णांपैकी १०% रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.
तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांपैकी ८% ते १०% रुग्णांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे एकठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्यामुळे चीनसमोर आता नवीन संकट उभं राहिलं आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®