Cove Tea Benefits : हिवाळ्यात लोक मोठ्या प्रमाणात सर्दी-खोकल्याच्या समस्येने त्रस्त असतात. हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते म्हणून अशा आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, अशा स्थितीत थंडीच्या काळात शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. हिवाळ्यात बहुतेक लोक चहाचे सेवन करतात. यामध्ये आल्याच्या चहाचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते.
पण तुम्ही कधी लवंग चहा प्यायला आहे का? होय, स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरला जाणारा लवंगापासून बनवलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार लवंग अनेक रोगांच्या उपचारात फायदेशीर आहे.
लवंगमध्ये मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स, अँटी-मायक्रोबियल, अँटी-व्हायरल आणि वेदनाशामक गुणधर्म आढळतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. लवंगाचा चहा प्यायल्याने सर्दी, खोकला, कफ, ताप आणि संसर्गाच्या समस्या दूर होतात. दररोज लवंगाचा चहा प्यायल्याने इतरही अनेक आरोग्य फायदे मिळतात. चला त्याबद्दल जाणून घेऊया..
हिवाळा
रोगप्रतिकार शक्ती वाढवते
हिवाळ्यात लवंगाचा चहा प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. खरं तर, लवंगात अँटिऑक्सिडेंट असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. लवंगाचा चहा रोज प्यायल्याने रोग आणि संक्रमणांपासून बचाव होतो.
सर्दी आणि खोकल्यापासून आराम
हिवाळ्यात लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास सर्वात जास्त होतो. अशा परिस्थितीत लवंग चहा पिणे खूप फायदेशीरमानले जाते. वास्तविक, लवंगात अँटी-व्हायरल, अँटीमाइक्रोबियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. लवंगाचा चहा प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यापासून सुटका मिळते.
दातदुखीपासून आराम
लवंगीचा चहा प्यायल्याने दातदुखीपासून खूप आराम मिळतो. लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे दातदुखीपासून मुक्त होण्यास मदत करतात. यासोबतच लवंगीचा चहा प्यायल्याने श्वासाची दुर्गंधी आणि पायरियाची समस्या दूर होते. जर तुम्ही दात किंवा हिरड्यांमध्ये दुखणे आणि सूज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर लवंग चहाचे सेवन करा.
सायनसपासून आराम
हिवाळ्यात सायनस आणि छातीत रक्तसंचय होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. लवंगाचा चहा प्यायल्याने सायनस आणि खोकल्याच्या समस्यांपासून खूप आराम मिळतो. लवंगाचा चहा रोज प्यायल्याने छातीत जमा झालेला कफ निघून जातो, ज्यामुळे सायनस आणि अस्थमासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
पचनक्रिया निरोगी राहते
लवंगाचा चहा प्यायल्याने पचनसंस्थाही निरोगी राहते. दररोज एक कप लवंग चहा प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होते. पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांमध्ये लवंगाच्या चहाचे सेवन खूप फायदेशीर आहे. लवंगाचा चहा प्यायल्याने अन्न पचन होण्यास मदत होते आणि ॲसिडिटीची समस्याही दूर होते.
टीप : हिवाळ्यात दररोज लवंग चहा पिल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. लवंग चा चहा सर्दी आणि खोकला वर रामबाण उपाय आहे. पण, लवंग ही प्रकृतीत उष्ण असते, त्यामुळे तिचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे.