Dal Chawal : डाळ आणि भातामध्ये अंड्याइतकेच प्रोटीन, शाकाहारी लोकांनी आजच आहारात करा समावेश !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dal Chawal : निरोगी राहण्यासाठी शरीरातील पोषक तत्वांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराला प्रथिने पुरवण्यासाठी काही लोक विविध सप्लिमेंट्सचा आहारात समावेश करतात तर काही लोकं आहारात अंडी, मांस याचा समावेश करतात. अशास्थितीत शाकाहारी लोकांना खूप समस्या येतात.

पण तुम्हाला माहिती आहे का? शाकाहारी लोक सामान्य अन्न खाऊनही प्रथिने मिळवू शकतात. होय, डाळ आणि भात खाल्ल्याने शरीराला अंडी खाण्याइतकीच प्रथिने मिळतात. तुम्ही रोजच्या आहारात याचा समावेश करू शकता. आज आपण डाळ-भात आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही शाकाहारी असाल आणि प्रथिने पुरवण्यासाठी अंडी खाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही डाळ आणि भात खाऊनही प्रोटीनची कमतरता पूर्ण करू शकता. डाळ आणि भात एकत्र करून खाणे तुमच्यासाठी प्रथिनांचा एक चांगला स्रोत असल्याचे सिद्ध होते.

खरे तर, प्रथिने तयार करण्यासाठी 20 अमीनो ऍसिडची आवश्यकता असते. ज्यामधून आपले शरीर फक्त 11 अमीनो ऍसिड बनवू शकते आणि इतर ऍसिड तयार करण्यास असमर्थ ठरते. ही ऍसिडस् तुम्हाला डाळ आणि भातामधून मिळू शकतात. डाळीमध्ये लाइसिन नावाचे अमिनो आम्ल आढळते.

जे भातामध्ये नसते. त्याच वेळी, तांदळात मेथिओनिन आणि सिस्टीन नावाचे अमिनो अ‍ॅसिड आढळतात. हे आम्ल डाळींमध्ये आढळत नाही. अशास्थितीत डाळ आणि भात एकत्र मिसळून, हे ऍसिड 9 अमीनो ऍसिड तयार करतात, ज्यामुळे तुम्हाला अंड्याइतके प्रोटीन मिळू शकते.

प्रथिनांचा इतर स्रोत

जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्हाला प्रथिनांचा पुरवठा करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेले पदार्थ खाऊ शकता.

-तुम्ही चीज, टोफू, टेम्पेह, बीन्स इत्यादींचे सेवन करू शकता.

-तुम्ही हिरवे वाटाणे, स्पिरुलिना, बिया आणि सोया दूध इत्यादींचे सेवन करू शकता.

-तुम्ही चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स, नट्स आणि काही भाज्या देखील खाऊ शकता.