वॉशिंग्टन : म्हातारपण अटळ असले तरी ते शक्य तेवढे पुढे ढकलण्यासाठी काहीजण सतत धडपडत असतात. व्यायाम, खाणेपिणे व सौंदर्यप्रसाधनांच्या मदतीने त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात.
यासाठी मशरूमही कामी येऊ शकते. मशरूममध्ये म्हातारपणाचा वेग कमी करण्यासोबतच आरोग्य उत्तम ठेवणाऱ्या काही अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविकांचे प्रमाण अतिशय जास्त असते. एका अध्ययनातून हा दावा करण्यात आला आहे.
मशरूममध्ये अँगोथियोनि आणि ग्लुटोथियोन मोठ्या प्रमाणावर असते. हे दोन्ही घटक अत्यावश्यक प्रतिजैविके आहेत. त्यांची संख्या मशरूमच्या प्रत्येक प्रजातीमध्ये वेगवेगळी असते.
अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिचे प्राध्यापक रॉबर्ट बीलमॅन यांनी हे अध्ययन केले असून त्यांच्या माहितीनुसार, हे दोन्ही घटक प्रतिजैविकांचा सवार्ेत्तम स्रोत असून मशरूमच्या काही प्रकारांमध्ये दोन्हीही एकाचवेळी आढळून येतात.
ऊर्जा तयार करण्यासाठी शरीर अन्नाचा वापर करते, त्यावेळी त्यांच्यामुळे ‘ॲक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ही तयार होतो. शरीरात प्रतिजैविकांचा पुन्हा पुरवठा करून या अक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून बचाव केला जाऊ शकतो,