Diabetes Patient Diet : मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आहारात करावा ‘या’ डाळींचा समावेश, काही दिवसातच नियंत्रणात येईल साखर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Diabetes Patient Diet : मधुमेह किंवा डायबिटीस ही वेगवेगळ्या वयोगटातील लोकांमध्ये मोठी समस्या बनली आहे. निष्काळजीपणामुळे या आजाराची वाढ होते. अलीकडच्या काळात हा आजार अतिशय वेगाने पसरत असल्याने मधुमेहाच्या रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

नाहीतर त्यांची रक्तातील साखरेची पातळी कधीही नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असते. अशा वेळी मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात काही डाळींचा समावेश केला. या दाली तुम्ही नियमित खाल्ल्या तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. काही दिवसात तुमची रक्तातील साखर नियंत्रणात येऊ शकते.

आहारात करा या कडधान्यांचा समावेश

भारतात मोठ्या प्रमाणात कडधान्य पिकवले जाते. कडधान्य हा प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्याने अनेकजण दिवसातून एकदा तरी कडधान्य खाणे पसंत करतात. यामध्ये असणारे पोषक तत्वामुळे फक्त तुमचे शरीर निरोगी ठेवत नाही तर त्याचे इतर खूप फायदे आहेत. महत्त्वाचे म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ते खूप फायदेशीर आहे.

राजमा

अनेक घरांमध्ये राजमाचा आहारात समावेश करण्यात येतो. हे चवदार असण्यासोबतच तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे आढळतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असून कॉम्प्लेक्स कर्बोदकेही मर्यादित प्रमाणात असतात. यात असणाऱ्या प्रथिने आणि फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

चणे

चण्यामध्ये प्रथिने आणि लोह मुबलक प्रमाणात असतात. यात असणारे पोषक तत्व माणसाच्या शरीरासाठी खूप फायद्याचे असते. घोड्यांना हे चणे खायला देतात. यातील पोषक घटक टाईप 2 मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे मधुमेहाचे रुग्ण नियमितपणे चणे खाऊ शकतात. यामुळे तुमच्या रक्तातील साखर अजिबात वाढत नाही. तसेच शरीर निरोगी ठेवले जाते.

मूग डाळ

मूग डाळ ही हलकी असल्याने अनेकजण त्यांच्या आहारात मूग डाळीचा समावेश करतात. खास करून ते जुलाब किंवा उलट्या होत असतील तर खाल्ले जाते. यामुळे पोट साफ राहते. शिवाय या डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. याचे सेवन केले तर रुग्णांना कसलाच त्रास होत नाही. मूग डाळ रक्तातील साखरेच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असल्याने ते रक्तातील साखर वाढू देत नाही.