Diwali 2023 : दिवाळीच्या रात्री तिजोरीत ठेवा ‘या’ 5 वस्तू, कधीही भासणार नाही पैशांची कमतरता !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Diwali 2023 : सध्या सर्वत्र थाटामाटात दिवाळी साजरी केली जात आहे. संपूर्ण देशात दिवाळीचा आनंद आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते. या दिवशी सर्व भक्त मनोभावे माता लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मी देवीला प्रसन्न करतात.

या खास दिवशी लोक वेगवेगळ्या उपायांनी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. अशातच दिवाळीच्या दिवशी तिजोरीत काही गोष्टी ठेवणे खूप फायदेशीर मानले जाते. पूजेनंतर रात्रीच्या वेळी काही वस्तू घराच्या लॉकरमध्ये ठेवल्याने पैशाचे आणि अन्नाचे भांडार नेहमी भरलेले असते. आणि तुम्हाला पैशांशी संबंधित कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही.

लक्ष्मी पूजन झाल्यानंतर घराच्या तिजोरीत ठेवा ‘या’ वस्तू !

गोमती चक्र

दिवाळीच्या दिवशी गोमती चक्राची पूजा केल्यानंतर त्याला हळद आणि चंदनासह पिवळ्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा. असे केल्याने धन-समृद्धी वाढते. आणि कधीही पैशांची कमतरता भासत नाही.

10 रुपयांच्या नोटांचा डबा

दिवाळीच्या रात्री तिजोरीत 10 रुपयांचे बंडल ठेवा. तसेच चांदी, तांबे, पितळेची नाणी ठेवणे देखील खूप शुभ मानले जाते. असे केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

सुपारी

पूजेत सुपारीला विशेष महत्त्व आहे. तुम्ही सुपारीची, फुले, कुंकू, अक्षता यांनी पूजा करावी. नंतर ते तिजोरीत ठेवावे. असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. तसेच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

पिवळ्या रंगाची कौडी

दिवाळीच्या पूजेच्या वेळी लक्ष्मीला पिवळ्या रंगाची कौडी अर्पण करा. पूजा आटोपल्यानंतर ही कौडी तिजोरीत ठेवा. असे केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.

पिंपळाचे पान

दिवाळीच्या रात्री पिंपळाच्या पानावर कुमकुम लावून त्याला तिजोरीत ठेवा. असे केल्याने गरिबीपासून मुक्ती मिळते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.