Diwali 2023 Rajyog : गुरू ग्रहाची सरळ चाल ‘या’ राशींसाठी ठरेल फायदेशीर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Diwali 2023 Rajyog : हिंदू धर्मात कुंडली आणि ग्रहांना विशेष महत्व आहे. ग्रह माणसांच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावतात. ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो.

जेव्हा ग्रह मार्गी किंवा वक्री असतात तेव्हा शुभ आणि अशुभ असे परिणाम दिसून येतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. अशातच या वर्षाच्या शेवटच्या दिवशी देवगुरु गुरु मार्गी होणार आहे.

सध्या गुरू वक्री अवस्थेत भ्रमण करत आहे. गुरु मार्गी होताच एक दुर्मिळ राजयोग तयार होईल. ज्याचा अनेक राशींवर परिणाम होणार आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी देवगुरू बृहस्पति मार्गी होणार आहे. यासह मध्य त्रिकोण राजयोग देखील तयार होईल. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत.

ज्योतिष शास्त्रात देवगुरूला विशेष महतव आहे. गुरु हा ज्ञानाचा, मोठा भाऊ, शिक्षण, धार्मिक कार्य, पुण्य आणि वृद्धीचा स्त्रोत मानला जातो. अशातच जेव्हा गुरु आपली चाल चालतो तेव्हा त्याचा इतर राशींवर परिणाम दिसून येतो.

गुरूच्या हालचालीचा ‘या’ राशींना होईल फायदा !

मिथुन

गुरू मार्गी असल्यामुळे मिथुन राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात इच्छा पूर्ण होताच तुमचा निश्चय होईल, तसेच धैर्य वाढेल. या काळात बुद्धिमत्ता शिखरावर असेल. याद्वारे जीवनसाथीचा शोध पूर्ण होऊ शकतो.

कर्क

कर्क राशीत हा राजयोग तयार होत आहे. राशीच्या दहाव्या घरात गुरु मार्गी असेल. त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल. या काळात अधिक पैसा कमावल्याने मान-प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभासोबतच नवीन नोकरीच्या संधीही प्राप्त होत आहेत.

सिंह

या राशीच्या लोकांना 2024 च्या सुरुवातीला मध्य त्रिकोणातून महत्त्वपूर्ण लाभ मिळतील. या काळात नशिबाने सर्व कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात मान-सन्मान मिळेल. तुम्हाला देश-विदेशात प्रवास करावा लागू शकतो. गुरु ग्रह नवव्या घरात मार्गी असेल. अशा स्थितीत धार्मिक आणि शुभ कार्य होतील.

धनु

धनु राशीला केंद्र त्रिकोणाचा लाभ मिळेल. 2024 च्या सुरुवातीला चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच कुंडलीच्या पाचव्या घरात गुरुचे संक्रमण होत आहे. गुरु ग्रह मार्गी पंचम भावात असल्यामुळे शुभवार्ता मिळतील. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला फायदा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उर्जा आणि धैर्य वाढेल. प्रेमसंबंधात यश मिळण्याचीही शक्यता आहे.

कन्या

कन्या राशीसाठी बृहस्पति मार्गी असल्यामुळे खूप शुभ राहील. सुट्टीचे नियोजन करण्यासाठी ही सुवर्ण वेळ असेल. नात्यात उत्साह राहील. अनुभवाचा आनंद मिळेल. या काळात सर्व इच्छा पूर्ण होतील.