चेहऱ्यावरील डाग,डोळ्याखालील वर्तुळे घालवण्यासाठी करा ‘हे’घरगुती प्रयोग

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- बऱ्याचदा चेहऱ्यावर व्रण किंवा काळे डाग पडलेले असतात. ते घालण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात . परंतु यासाठी महागडी कॉस्मेटिक्स वापरण्यापेक्षा घरगुती उपाययोजना केल्या तर फायदेशीर ठरू शकते.

काही नैसर्गिक पदार्थांमध्ये ब्लीचिंग एजंट असते जे डाग कमी करण्यास मदत करतात. याच्या प्रयोगाने काही दिवसांतच चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्सचे डाग, डार्क सर्कल, जखमांच्या खुणा आणि चिकनपॉक्सचे निशाण कमी होण्यास मदत होईल.

१) आंबट पदार्थ वापरा लिंबू, टोमॅटो, व्हिनेगार हे नैसर्गिक आंबट असणारे पदार्थ पदार्थ चेहऱ्यावरील डाग घालवण्यास मदतगार ठरतात. हे पदार्थ केवळ डागांवरच लावा. चेहऱ्याच्या इतर ठिकाणी लावू नका. हे पदार्थ दररोज डागांवर लावा आणि सुकल्यावर धुवून टाका.

२) बटाटा आणि कांदा कांद्यामध्ये सल्फर अशते ज्यामुळे डाग कमी करण्यास मदत होते. व्हिनेगारमध्येही हे गुण असतात. तसेच बटाट्यामुळे डोळ्यांच्या खालचे काळे डाग जाण्यास मदत होते. त्यामुळे कांदा व बटाट्याचे काप चेहऱ्यावर लावा.

३) मध जखमांचे पडलेले व्रण कमी करण्यासाठी मध फायदेशीर आहे. मध आणि लिंबू मिसळून जखमेच्या ठिकाणी लावा. मुलतानी माती लावल्यानेही चेहऱ्यावर ग्लो येतो. डाग कमी होतात.

४) चंदन शुद्ध चंदनामध्ये डाग कमी करण्याचे सामर्थ्य असते. चंदन पाण्यात मिक्स करून लावल्याने फायदा होतो. यामुळे डाग तर जातीलच परंतु चेहरा उजळून निघेल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24