Dream Astrology : रात्री झोपल्यानंतर, लोक सहसा दुसऱ्या जगात प्रवास करतात. ज्यावर त्यांचे नियंत्रण राहत नाही. रात्री आपण स्वप्नांच्या नगरीत प्रवेश करतो जिथे आपल्याला कधी वाईट तर कधी चांगली स्वप्ने पडतात.
बऱ्याचदा आपण ही स्वप्ने सकाळी उठल्यावर आपण विसरून जातो, पण अशी काही स्वप्ने असतात जी आपल्याला दीर्घकाळ लक्षात राहतात. स्वप्न शास्त्रामध्ये प्रत्येक स्वप्नाचे वेगवेगळे महत्त्व सांगितले आहे. ज्याचा थेट संबंध नशिबाशी जोडला गेला आहे.
स्वप्नात दिसणारी प्रत्येक गोष्ट शुभ आणि अशुभ चिन्हे मानली जातात. पण असं असलं तरी सकाळी पडलेली स्वप्नं सत्यात उतरतात हे आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. यात किती तथ्य आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
खरं तर सूर्योदयाच्या 72 मिनिटे आधी आणि 1.5 तास आधीच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. ब्रह्म मुहूर्तामध्ये जागरण केल्याने व्यक्तीचे मन शांत आणि ताजेतवाने होते. या काळात जागरण केल्याने लोकांचे मन शांत राहते आणि ते त्यांचा संपूर्ण दिवस उत्साहात घालवतात. या शुभ काळात मुले ज्या गोष्टींचा अभ्यास करतात त्या दीर्घकाळ लक्षात ठेवतात. याशिवाय पहाटे 3 ते 5 या वेळेत स्वप्ने पाहणे खरे मानले जाते असे स्वप्न पुस्तकात नमूद केले आहे.
ब्रह्म मुहूर्तामध्ये स्वप्न पाहणे हे धनाच्या आगमनाचे लक्षण आहे. याचा अर्थ असा की लवकरच तुमच्यावर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होईल. स्वप्न शास्त्रानुसार यावेळी स्वप्न पाहणे खूप फलदायी मानले जाते.