अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- अनेकांना हिवाळा ऋतू आवडत असतो. तर अनेकांना या ऋतूत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातच कोरडी त्वचा असलेल्यांसाठी थंड हवामान आणखी आव्हानात्मक बनते.(dry skin in winter)
त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हांला हिवाळ्यात कोरड्या त्वचेचा त्रास होत असेल तर अंघोळ करताना काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या त्वचेचा कोरडेपणा कमी करू शकता. काय आहेत या टिप्स ? चला तर मग जाणून घेऊ कमी वेळात
आंघोळ करा : हिवाळ्यात थंड हवामानामुळे त्वचा स्वतःच कोरडी होऊ लागते. त्यामुळे जास्त वेळ अंघोळ केली तर त्वचेचे तेल निघून जाते. अशा स्थितीत हिवाळ्यात अंघोळीची वेळ कमी ठेवावी. जेणेकरुन जास्त वेळ पाण्यात राहू नये.
अति उष्ण पाण्याने आंघोळ करणे टाळा : प्रत्येकाला गरम पाण्याने अंघोळ करायला आवडते, परंतु ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी
खूप गरम पाण्याने आंघोळ करू नये. याशिवाय ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील आहे, त्यांनी गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे.
साबणाची निवड योग्य असावी : खास हिवाळ्यासाठी अनेक साबण आज बाजारात उपलब्ध आहे. साबण तुमच्या त्वचेसाठी स्वच्छ करणारे म्हणून काम करतात, त्यामुळे साबण तुमच्या त्वचेवर साठलेली नैसर्गिक आर्द्रता देखील काढून टाकतात. अशावेळी तुम्ही मिल्क बॉडी वॉश किंवा कमी रासायनिक साबण वापरावा.
स्क्रबिंग टाळा : कोरड्या त्वचेवर स्क्रब केल्याने तुमच्या शरीरातील कोरडेपणा आणखी वाढतो. त्यामुळे अंघोळ करताना स्क्रब वापरू नका. या काही टिप्सचा वापर करून तुम्ही सहजरित्या हिवाळ्यात ड्राय स्किनपासून सुटका मिळवू शकाल…