अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी माणसाला स्थूल बनवते. जाडसर पणा आपल्या सौंदर्यात बाधा बनतो. बरेच लोक वाढलेली चरबी कमी करण्यासाठी जिममध्ये मेहनत करतात. डाएट प्लॅन करतात.
परंतु वजन कमी करण्यासाठी तुम्हांला हेल्दी आणि नॅचरल पर्याय वापरले पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीरात जमा झालेला टॉक्सिन बाहेर येण्यास मदत होते आणि तुमचे वजन लवकर कमी होते.
गरम पाणी, मध आणि लसणाचा रस पिल्याने शरीरातील मेटबॉलिज्म चांगला होतो. हा रस रोज सकाळी उपाशी पोटी नियमित प्यायल्यास शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि शरीरातील एक्स्ट्रा कॅलेरीज जाळून जातात.
हा रस रोज सकाळी उपाशी पोटी प्यायला हवा आणि त्यानंतर जास्त नाश्ता केला पाहिजे. कच्च्या लसणात जास्त प्रमाणात एन्टीऑक्सिडेंट असते.
लसूण मधामध्ये मिसळून खाल्ल्यास वजन कमी करण्यास मदत होते. तसेच शरीरातील दुर्गंधी बाहेर पडण्यासही मदत होते. हे मिश्रण पूर्णपणे एक डिटॉक्स मिश्रण आहे.
हे खाण्याचे खूप प्रकार आहेत. याला गरम पाण्यात मध, कोरफड, लिंबाचा रस, एप्पल सायडर व्हेनिगर किंवा कोणत्याही हर्बलच्या चहामध्ये मिसळून त्यासोबत कच्चा लसूण खावा.
हे मिश्रण तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी खाल्ले तर त्याचा जास्त फायदा होतो. परंतु हे करताना एक लक्षात ठेवा की, ४ पाकळ्याशिवाय जास्त लसूण खाऊ नये.
लसूण जास्त खाल्ल्यास साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता आहे. तसेच नियमितपणे लसूण खाल्ल्यास शरीरातील एक्स्ट्रा चरबी कमी करण्यास मदत होते. ‘’’’’
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com