Old Coins : तुमच्याकडे पण आहे का वीस पैशांचे नाणे ?वीस पैशांचे नाणे सध्या भलतेच ‘चलनात’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Old Coins : जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांना पुरातन वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो. अशा पुरातन वस्तू मिळवण्यासाठी असे छंदिष्ट लोक वाट्टेल तेवढी किंमत चुकवायला मागे-पुढे पाहात नाहीत.

असे एक वीस पैशांचे नाणे जे बऱ्याच वर्षांपूर्वी चलनातून बाद करण्यात आले आहे, त्याची चर्चा जोरात आहे. कारण ई-बे या ऑनलाइन खरेदी- विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्याऱ्या साईटवर हे वीस पैशांचे नाणे सध्या भलतेच ‘चलनात’ आहे.

या नाण्याच्या मूळ किमतीहून तब्बल एक हजार पट अधिक दाम देण्यासाठी खरेदीदारांची रांग लागली आहे. वीस पैशांची ही नाणी सध्या या शॉपिंग वेबसाईटवर हातोहात विकली जात आहेत. असे सांगितले जात आहे की, वीस पैशांचे हे नाणे दुर्मीळ आहे. म्हणजे हे नाणे चलनातून कधीच बंद झाल्यामुळे तशी त्याची काहीही किंमत नाही.

असे असूनही हे नाणे अत्यंत मौल्यवान ठरले आहे. कारण आता वीस पैशांचे हे नाणे फारच कमी लोकांकडे आहे. खरेतर हे नाणे वीस पैशांचे नसून वीस पेन्सचे ब्रिटिश नाणे आहे. हे नाणे सन १९८३ मध्ये चलनात आणण्यात आले होते.

हे नाणे तांब्यापासून बनवण्याचे ठरले होते. पण काही कारणांमुळे वीस पेन्सची काही नाणी ब्रॉन्झ धातूमध्ये बनवण्यात आली होती. हीच ती नाणी आहेत की जी अत्यंत दुर्मीळ मानली जात आहेत.