Dream Astrology : रात्री झोपल्यानंतर, लोक सहसा दुसऱ्या जगात प्रवास करतात. ज्यावर त्यांचे नियंत्रण राहत नाही. दुसऱ्या जगात म्हणजे स्वप्नांच्या जगात प्रवेश करतात, यावेळी कधी-कधी आपल्याला इतकी भितीदायक स्वप्ने दिसतात तरी देखील आपण त्या स्वप्नातून लवकर बाहेर पडत नाही.
झोपेत भयानक स्वप्ने पडणे सामान्य आहे. मात्र, यामागे अनेक कारणे असू शकतात. वाईट स्वप्नांचा अर्थ बहुतेक वेळा व्यक्तीच्या चिंता आणि भीतीशी संबंधित असतो. हे अनेकदा त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीचे आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब असते. काही लोक वाईट स्वप्ने विसरतात, तर काहींना ते विसरता येत नाहीत.
त्याच वेळी, स्वप्न विज्ञानामध्ये, स्वप्नात पाहिलेल्या प्रत्येक घटनेचा वास्तविक जीवनाशी थेट संबंध असल्याचे मानले जाते. त्यामुळे आजच्या लेखात आम्ही तुम्हाला भीतीदायक स्वप्नांची काही कारणे सांगणार आहोत, जेणेकरून तुमची भीतीही कमी होऊ शकेल. चला तर मग…
अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की काही लोक भयानक स्वप्ने पाहून रात्री अचानक जागे होतात, ज्याला “नाईटमेअर” म्हणतात. अशी स्वप्ने पाहिल्यानंतर, व्यक्ती गंभीर चिंता आणि भीतीमध्ये बुडते. जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा मनाची नियंत्रण शक्ती कमी असते, त्यामुळे स्वप्ने खरी वाटतात. या कारणामुळे आपण अचानक झोपेतून जागे होतो.
असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती जास्त ताण घेते तेव्हा त्याला भयानक स्वप्ने येण्याची शक्यता वाढते. तणावामुळे मानसिक आणि शारीरिक स्थितीत बदल होतो, ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो. यामुळे वाईट स्वप्न पडतात. वास्तविक, जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा झोप अनेकदा अपूर्ण राहते. म्हणूनच भीतीदायक स्वप्ने अधिक प्रबळ होतात.
तसेच, जेव्हा लोक भयपट चित्रपट पाहतात किंवा झोपायच्या आधी भयपट कथा वाचतात तेव्हा त्यांना भीतीदायक स्वप्ने पडतात. त्याचा परिणाम माणसाच्या मनावर होतो.