Indian Masala : तुम्हीही भाजीत ‘हे’ मसाले वापरताय? सावधान, होऊ शकतो कॅन्सर…

Content Team
Published:
Indian Masala

Indian Masala : मसाल्यांचा वापर केवळ भारतातच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतीय मसाल्यांना जगभरात पसंती दिली जाते. पण नुकतीच समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय मसाल्यांमध्ये असे काही घटक आढळून आले आहेत जे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. यामध्ये भारतातील नामवंत कंपनींचा समावेश आहे.

नुकतेच एका रिचर्सनुसार, MDH आणि एव्हरेस्ट या जगातील नामांकित मसाल्यांच्या कंपन्यांच्या काही उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईड नावाचे रसायन सापडले आहे. हे रसायन आरोग्यासाठी हानीकारक असण्याबरोबरच यामुळे कर्करोग देखील होतो. अशास्थितीत बाहेरील देशांमध्ये या मसाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे, कोणते आहेत ते देश पाहूया…

या मसाल्यांच्या काही नमुन्यांमध्ये इथिलीन ऑक्साईड नावाचे रसायन आढळल्यानंतर या मसाल्यांच्या काही उत्पादनांवर सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या देशांमध्ये बंदी घातल्यानंतर भारताने सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये बंदी घालण्याच्या कारणांचा अहवालही मागवला आहे. त्यानंतर भारत सरकार या मसाल्यांवर कारवाई करू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगच्या अन्न सुरक्षा नियामकांच्या मते, या मसाल्यांमध्ये हानिकारक रसायने जास्त प्रमाणात असतात. अशा परिस्थितीत या कंपन्यांच्या 4 मसाल्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

इथिलीन ऑक्साईडचे तोटे :-

-इथिलीन ऑक्साईडचा आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो.

-हे रसायन तुमच्या मज्जासंस्थेवर तसेच तुमच्या डीएनएवर परिणाम करू शकते.

-इथिलीन ऑक्साईड कर्करोगाच्या पेशी वाढवते, कर्करोगाचा धोका वाढवते.

-या रसायनामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि कधीकधी फुफ्फुसाचा त्रास देखील होऊ शकतो.

-ते वापरल्याने किंवा अनेक वेळा वास घेतल्याने अशक्तपणा, थकवा आणि आळस यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

घरी बनवा मसाले :-

बाजारातून आलेले मसाले खाण्याऐवजी घरीच तयार करा. घरी बनवलेले हे मसाले आरोग्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe