केळी खरेदी करताय? अशी घ्या खबरदारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  केळ हे वर्षभर मिळणारे फळ आहे. तसेच याची किंमतही जास्त नसल्याने ते सर्वसामान्यांच्या आहारामध्ये नेहेमुचं असते. केळीमुळे त्वरित उर्जा मिळते.

परंतु सध्या केळी पिकवण्याची पद्धत जी आहे त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. यासाठी केळी खरेदी करताना काही खबरदारी नक्की घ्यायला हवी.

१) आपण केळे कशासाठी घेत आहोत आणि एका दिवसात आपण किती केळी खाणार याचा अंदाज घेऊन केळी खरेदी करावी. खरेदी करताना जाडीला चांगली आणि मध्यम आकाराची केळी खरेदी करणे उत्तम.

२) लहान आकाराची केळी कच्ची असू शकतात. पूर्ण तयार केळी स्वादाला जास्त चांगली असतात. अर्धवट कच्ची केळी पोटदुखी निर्माण करू शकतात.

३) सालीवर हिरवटपणा असेल तर ती केळी पूर्ण पिकलेली नसतात. पण घरी नेऊन लगेच त्याचा वापर करणार नसाल तर अशी केळी खरेदी करण्यास हरकत नसते. केळी लगेच पिकतात.

अशी थोडी कच्ची केळी अधिक दिवस चांगली राहू शकतात. पण पूर्ण पिकल्याशिवाय ती खाऊ नयेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24