आहारात रोज चपाती खाताय ? जाणून घ्या ‘या’ फायदेशीर गोष्टी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-  बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजार बळावत चालले आहेत. बैठे काम आणि व्यायामाचा अभाव यामुळे वजन वाढण्याची समस्या कॉमन झालेली आहे. घरी तयार केलेल्या अन्नाचे सेवन बहुतांश लोक करत आहेत.

पण सतत चपाती आणि भात खाऊन वजन वाढण्याची शक्यता आहे. परंतु जर आपण आहारात चपाती सेवन करत असाल तर काही गोष्टी लक्षात घ्या. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात चपातीचा समावेश करू शकता. त्यासाठी कमी कॅलरीजयुक्त चपाती असायला हवी.

एका चपातीमध्ये ५७ कॅलरी असतात. चपातीमधील आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम अनेक आजारांना दूर करण्यात मदत करते.

चपातीला तेल किंवा तूप लावून खाल्ल्याने यामधील कॅलरी वाढतात . म्हणून शक्यतो तूप किंवा तेल न लावता चपाती खावी. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका नसतो.

डायबिटिसचा ज्यांना त्रास आहे अशांसाठी चपातीचे सेवन करणे फायदेशीर ठरतं. त्यासाठी सकाळी चपाती दुधात कुस्करून खाल्ल्यास नाष्त्यासाठी एक चांगला ऑप्शन असेल तसंच यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील. शिवाय कॉलेस्ट्रॉल सुद्धा वाढणार नाही.

रक्तदाबासंबंधी समस्या असल्यास चपातीच्या सेवनाने कमी होतात. घरच्याघरी तुम्ही व्यायाम करत असाल तर दुधासोबत चपाती खाऊ शकता.

अलिकडे कोरोना व्हायरसचा प्रसार होत असताना बाहेरंच खाणं घातक ठरू शकतं म्हणून पोषक घटक शरीराला मिळण्यासाठी चपातीचे सेवन करा. कारण चपातीचे सेवन हे शरीराला त्वरित उर्जा देणारे आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24