अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-अंडे खाणे शरीरासाठी इष्ट असते. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांचा साथ असतो. अनेकांना अंडी आवडतातही. अंड्यांमध्ये अनेक घटक आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
डॉक्टरांकडून नेहमीच आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घेऊयात अंड्यामुळे शरीराला होणारे फायदे –
१) शरीर सुदृढ होते
अंड्यामध्ये फोलेट म्हणजेच अ, ब १२ ब ५ आणि ब २ ही जीवनसत्त्वे असतात. याबरोबरच फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, ओमेगा ३ आणि इतर अनेक महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे तंदुरुस्तीसाठी दररोज एक अंडे खाणे अतिशय आवश्यक आहे.
२) कोलेस्टेरॉलपासून रक्षण
अंड्यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असले तरीही त्याचा शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
कोलेस्टेरॉलमधील अनेक घटक आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. आहारात अंड्याचा समावेश केला तरीही शरीरावर किंवा रक्तातील कोलेस्टेरॉलवर त्याचा परिणाम होत नाही.
३) दृष्टी सुधारते
अंड्यामध्ये ल्यूटीन आणि झिझेन्थिन ही दोन अँटी ऑक्सिडंटस असतात. हे दोन्हीही घटक उत्तम दृष्टीसाठी अतिशय आवश्यक असतात.
अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये हे घटक समाविष्ट असल्याने बलक खाणेही तितकेच गरजेचे असते. मोतीबिंदू आणि रेटिनाच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी हे दोन्हीही अँटी ऑक्सिडंटस आवश्यक असतात.
४) हृदयरोग कमी होण्यास उपयुक्त
अंडी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. ज्यांना मधुमेह असतो त्यांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो. मात्र, अंडी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो,
असे कोणत्याही निरीक्षणात आढळून आलेले नाही. त्यामुळेच हृदयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंड्यांचा आहारातील समावेश उपयुक्त ठरतो.
५) वजन नियंत्रित राहते
अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने अंडी खाल्ल्यास बराच वेळ भूक लागत नाही. अंड्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि सातत्याने खाण्यावर नियंत्रण येते.
त्यामुळे जास्त कॅलरीज निर्माण होत नाहीत तर त्या वापरल्या जातात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com