लाईफस्टाईल

तुम्हाला माहीत आहे विमानाचा हॉर्न कधी वाजवतात ?

Published by
Ahmednagarlive24 Office

Marathi News : सायकलपासून मोठ्या जहाजांना वेगवेगळ्या आवाजामधील ‘हॉर्न’ असतात, हे बहुतेकांना माहीत आहे; पण आकाशात भिरभिरणाऱ्या विमानांना असे हॉर्न असतात का? आणि असले तरी वैमानिक कोणत्या क्षणी वाजवतात? त्याचा आवाज किती मोठा असतो ? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी सावधगिरीचा इशारा म्हणून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. अलीकडे जास्त प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसून येत आहे.

लोकसंख्येच्या तुलनेमध्ये वाहनांची संख्या जास्त झाल्यामुळे अपघाती बळींचा आकडा वाढतच आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या सायकलपासून दुचाकी, चारचाकी, सहाचाकी ते अगदी रेल्वे, जहाज यांना संभाव्य दुर्घटना टाळता याव्यात, म्हणून ‘हॉर्न’ची सुविधा करण्यात आली आहे.

एखाद्या परिस्थितीमध्ये कोणत्याही वाहनाचा चालक किंवा पादचारी जर अलर्ट नसेल तर त्याला संभाव्य धोक्याचा सिग्नल मिळावा, म्हणून हॉर्न वाजवला जातो आणि अपघात टाळता येणे शक्य होते.

अशावेळी मग प्रश्न उपस्थित होतो की, मग आकाशात विविध प्रकारची विमाने ज्यावेळी विहार करतात, त्यावेळी एखाद्या कठीण प्रसंगी अलर्ट म्हणून हॉर्न वापरला जातो की नाही? याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. कारण,

ज्यावेळी विमान आकाशामध्ये असते त्यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये हॉर्न वाजवण्यास परवानगी नसते; परंतु ज्यावेळी वैमानिक विमानाचे लॅण्डिंग करताना म्हणजे प्रत्यक्ष विमान रनवे वर उतरल्यानंतर ग्राऊंड इंजिनीअर आणि जबाबदार स्टाफ यांना अलर्ट करण्यासाठी हॉर्न वाजवू शकतो.

Ahmednagarlive24 Office