General Knowledge : तुम्हाला माहिती आहे ? पावसाळ्यात इमारती का कोसळतात ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

General Knowledge : पावसाळ्यात त्यांच्या कोसळण्याचे प्रमाण अन्य पेक्षा अधिक असते. पावसाळ्यात इमारती कोसळणे ही आता नित्वाची बाब झाली. आहे. मात्र, हा एक फार गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे केवळ जीवित तसेच मालमत्तेचीच हानी होते. इतकेच नाही तर आपल्या देशात बांधकामाचा दर्जा किती खालावला आहे, याचीही पदोपदी जाणीव होते.

पावसाळ्यात इमारती का कोसळतात याची प्रमुख कारणे आपण विचारात घेऊ. कुठल्याही इमारतीचा सगळ्यात मुख्य भाग म्हणजे त्याचा पाया. हा पाया कशा प्रकारची माती वापरून तयार केला गेला आहे, यावर बरेच काही अवलंबून असते. इमारत कुठल्याही प्रकारच्या मातीच्या भरावाने तयार केलेल्या पायांवर उभी आहे हे लक्षात घेणे सगळ्यात महत्त्वाचे.

माती पाच प्रकारची असते. १) काळी किंवा सुपीक माती ज्याला आपण ब्लॅक कॉटन सॉईल असे म्हणतो, ही माती शेतीसाठी उत्कृष्ट असते. कारण ती ओलावा टिकवून ठेवते. २) मोरङ, ३) खरडी आणि बरी ४) दगडी माती, ५) चिकणमाती वरील कुठल्या प्रकारच्या मातीवर इमारतीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग महणजे पाया बांधला गेला आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जर इमारत ब्लॅक कॉटन मातीवर बांधली गेली असेल तर ती ढासळण्याची शक्यता दुपटीने वाढते. कारण पावसाळातही माती आत जास्त प्रमाणात शोधून घेते आणि पाया दासळत जातो.

इमारतीची स्थैर्यशीलता एकदम कमी होते. या मातीचा अजून एक गुण म्हणजे ती पाण्यामध्ये असली की फुगते आणि पाणी नसले की आकुंचित होते, असे झाल्यास इमारतीत मेगा पडण्याची शक्यतादेखील असते. त्यामुळे कोणतीही इमारत बांधण्याआधी त्या जागेचे निरीक्षण करणे अत्यावश्यक असते.

इमारतीसाठी दगडी माती सगळ्यात उत्कृष्ट अशी माती पाणी शोषून ठेवत नाही आणि पावाला घट्ट धरून ठेवते. आणि त्वाची स्थेयशीलता वाढवते. अजून एक महत्त्वाचे असे की, इमारत बांधताना तिथल्या मातीची सेफ बेअरिंग केपॅसिटी अर्थात माती कितपत भार सहन करू शकेल, याचे अनुमान काढणे अत्यंत आवश्यक आहे.