मुलांनो, तुम्हाला हॅण्डसम दिसायचय? करा ‘हे’ घरगुती उपाय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- मुलींप्रमाणेच मुलांमध्येही सुंदर दिसण्यासाठी धडपड सुरु असते. मुलेही अनेकविध प्रकार किंवा इतर संसाधने वापरून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात.

आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. त्याचा वापर करून तुम्ही नक्कीच हॅण्डसम दिसाल.

१) पुदिना

 पुदिना चेहऱ्यासाठी चांगला आहे. पुदिना आणून तो सुकवून त्याची पूड करुन घ्या. ज्यावेळी तुम्हाला फेसपॅक तयार करायचा असेल त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये थोडी हळद आणि लिंबू पिळा. हा पॅक त्वचेला लावल्याने तुम्हाला तुमची त्वचा एकदम मुलायम झाल्यासारखी वाटेल.

२) बेसन पीठ

 बेसनात दूध, हळद, मध घालून हे मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण एकत्र करून त्वचेवर लावा. ५ मिनिटांनंतर हे मिश्रण लावून मसाज करा. १५ ते २० मिनिटांनंतर सुकल्यानंतर हे मिश्रण धुवून टाका.

३) मुलतानी माती

 अर्धा चमचा संत्र्याचा रस, त्यात ४ ते ४ थेंब लिंबाचा रस थोडी मुलतानी माती, अर्धा चमचा चंदन पावडर आणि थोडे गुलाबजल मिसळून थोडया वेळ फ्रिजमधे ठेवावे आणि नंतर चेह-याला लावा, १५ ते २० मिनीटांनी पाण्याने चेहरे स्वच्छ धुवावा.

४) मसुरची डाळ

  मसूर डाळीला टोमॅटोचा रस आणि कोरफडीसोबत एकत्र करून एक घट्ट पेस्ट तयार करा. तयार पॅक चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तासासाठी तसचं ठेवा. त्यानंतर हे थंड पाण्याने धुवून टाका. बेस्ट रिझल्टसाठी आठवड्यातून दोन वेळा लावा.

 हे चार घरगुती उपाय करून पहा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील सौंदर्य खुलवण्यास नक्कीच मदत होईल.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24