न्यूयॉर्क :- सूर्यप्रकाश एखाद्या वस्तूवर पुरेसा वेळ राहिला तर अनेक सूक्ष्मजीव नष्ट होतात आणि ती वस्तू स्वच्छ होते, या शास्त्रीय कारणांचा आधार घेत कोरोनाचाही विषाणू लवकरात लवकर नष्ट करता येतो, यावर अमेरिकेत संशोधन सुरू आहे.
सूर्यप्रकाशामुळे कोरोना विषाणूंचा नाश लवकर होतो, असे अमेरिकेतील होमलॅण्ड सिक्युरिटी विभागाला वाटते; परंतु याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. सूर्यप्रकाश घरात भरपूर यावा, असे वास्तुशास्त्र सांगते.
या अनुषंगाने अमेरिकेत प्रयोग करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी चलनी नोटा घेताना त्या अतिनील किरणाखाली (अल्ट्रा वायलेट रे) काही वेळ ठेवून नंतर त्या नोटा जमा करून घेतात, यामागे हेच कारण आहे.
सिमुलेटेड (बदली) सूर्यप्रकाशाचा उच्च दाबाने अशा विषाणूवर मारा केल्यानंतर तो अकार्यक्षम होतो, असे विज्ञान सांगते. या आधारे सध्या प्रयोग सुरू असताना सूर्यप्रकाशात कोरोना विषाणू जलद नष्ट करता येतो, असे प्राथमिक टप्प्यात लक्षात आले आहे.
सध्या जगभरातील ज्या काही देशांत उन्हाळा सुरू आहे, त्या देशांमधील कोरोना विषाणूचा प्रभाव कमी-कमी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या विषाणूचा अंत जवळ आला आहे, असे येथील शास्त्रज्ञांना वाटते.
सार्स विषाणू अतिनील किरणात १५ मिनिटांत नष्ट झाले आणि हा कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी हे तंत्र उपयुक्त ठरेल, असे मत जुआन लेओन यांनी व्यक्त केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®