अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- दूधाला पूर्णअन्न समजले जाते. दूधामध्ये प्रोटीन, कॅलरी, कॅल्शियम आणि व्हिटामिन डी, बी-2 ही पोषक तत्वे असतात. आरोग्यासाठी दूध हे आवश्यक आहे.
दूधात कॅल्शियम घटक मुबलक असल्याने हाडांच्या मजबुतीसाठी दूध आवश्यक आहे. त्यामुळे लहानमुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रकृतीनुसार दूधाचे सेवन फायदेशीर ठरते.
थंड दूध पिण्याऐवजी जर गरम दूध पिले तर ते आरोग्यासाठी पायदेशिर ठरते. गरम दूध प्यायल्याने हाडे मजबूत होऊन शरीरात ऊर्जा निर्माण होते. जाणून घेऊयात गरम दूध पिण्याचे फायदे
ब्लड शूगर लेव्हल राहते नियंत्रणा- रात्री झोपण्याआधी गरम दूध प्यावे, त्यामुळे ब्लड शूगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहत. मधुमेह असणाऱ्यांनी रोज झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध प्यावे.
तणाव कमी होण्यास मदत :- आपल्याला जास्त तणाव आणि थकवा जाणवत असेल त्यावेळी गरम दूध घ्या. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स होतात. गरम दुधामुळे स्नायू आणि मज्जातंतू तणावापासून मुक्त होतात.
वजन कमी होते :- एक ग्लास गरम दूध प्यायल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होते.
कॅल्शियमचा महत्वाचा स्रोत :- हिवाळ्यात अनेकांना सांधे दुखीचा त्रास होतो. जर रोज रात्री झोपण्याआधी गरम दूध पिले तर त्यांची हाडे मजबूत होतात. तसेच सांधेदुखी देखील होत नाही. गरम दूध प्यायल्याने हाडांची घनता सुधारते.
मासिक पाळीत तणाव कमी होतो :- काही महिलांना मासिक पाळीत तणाव वाढतो. हा तणाव कमी करण्यासाठी एक ग्लास गरम दूध पिणे चांगले. त्यामुळे तुम्ही पुन्हा तुचमा मूठमध्ये येता.
दररोज दूधात तूप टाकून प्या, पळून जातील आजार :- थंडीमध्ये गरम दूधात तूप टाकून प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.आर्युवेदानुसार, शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दररोज तूप टाकलेले गरम दूध प्यावे.
गरम दूधामध्ये तूप टाकून तुम्ही पिले तर शरीरात एंजाइम्स रिलीज होतात. हे एंजाइम्स तुमची पचन शक्ती वाढवतात. त्यामुळे जर तुम्हाला अपचन होत असेल तर तुम्ही रोज एक ग्लास तूप टाकलेले दूध पिले पाहिजे.