Marathi News : भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. नेपाळ आणि भारतात नुकताच भूकंप झाला तेव्हा लोक भयभीत झाले होते. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. आता आणखी एक मोठी चर्चा सुरु आहे.
ती म्हणजे पाकिस्तानात अत्यंत विनाशकारी भूकंप होणार आहे. आणि या भूकंपाची भविष्यवाणी करण्यात आली आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपाचा इशारा देणाऱ्या एका डच शास्त्रज्ञाने हा अंदाज वर्तवला आहे.
रिपोर्टनुसार, नेदरलँड्सस्थित संशोधन संस्थेने येत्या काळात पाकिस्तानात संभाव्य शक्तिशाली भूकंप होईल असा अंदाज वर्तवला आहे. सोलर सिस्टीम जिओलॉजिकल सर्व्हेच्या (एसएसजीईओएस) संशोधकांनी सांगितले की,
पाकिस्तान आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात हवामानात तीव्र चढ-उतार झाले आहेत जे आगामी तीव्र भूकंपाचे द्योतक असू शकतात. नेदरलँड्सचे भूकंपशास्त्रज्ञ फ्रँक हूगरबीट्स या संस्थेत आहेत. पाकिस्तान आणि आसपासच्या भागात मोठा भूकंप होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
फ्रँक हुगरबिट्झ हे तेच शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी तुर्की आणि सीरियातील प्राणघातक भूकंपाचा अंदाज वर्तवण्यासाठी गणिती साधनांचा वापर केला होता. मात्र, येत्या काही दिवसांत जोरदार भूकंप होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
पण ते केव्हा होईल याबाबत काही अंदाज बांधू शकत नाहीत. भारत आणि नेपाळमध्ये काही दिवसांतच भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 6.2 इतकी नोंदवण्यात आली होती .
दुसरीकडे, हा अंदाज येताच पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या हवामान खात्याला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. या अंदाजाला पूर्णपणे नकार देताना विभागाने म्हटले आहे की कोणत्याही भूकंपाच्या हालचालींचा अचूक अंदाज बांधणे अशक्य आहे.
नेदरलँडचे भूकंपशास्त्रज्ञ फ्रँक हूगरबीट्स त्यांच्या भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. भूकंपाचा अंदाज घेण्याची पद्धतही पूर्णपणे वेगळी आणि नवीन आहे. जेव्हा कधी भूकंप होणार असतो तेव्हा ते होण्याआधीच त्याचा अंदाज बांधतात.