अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुमचं शरीर बेडौल झालं आहे आणि लट्टपणामुळे काही शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे, तर घाबरू नका.
तर, खालील एरोबिक एक्सरसाइज करा. हे सगळे व्यायाम ३ ते ५ वेळा साधारण तीस मिनिटांसाठी करा. हे व्यायाम करण्याने तुमचं वजन निश्चितपणे कमी होईल सगळ्यात आधी फरशीवर झोपा.
आता दोन्ही पाय जमिनीवर टेकवून नितंब आणि गुडघ्यांना वर उचलत ९0 डिग्रीमध्ये कोन तयार करा. कोपर जमिनीला टेकत कंबरेला आधार द्या.
मग संपूर्ण शरीराला ताण द्या. हा व्यायाम पाच सेकंदांसाठी करा आणि पुन्हा पूर्वस्थितीत या. असं साधारण चाळीस वेळा करा. तुम्हाला निश्चितपणे फरक दिसेल.
० जांघा एकमेकांना घासल्या जात असतील… जर तुमच्या जांघा एकमेकांना चिकटून घासल्या जात असतील आणि यामुळे चालण्यास समस्या जाणवत असेल, तर या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी खालील व्यायाम करा ताठ उभे राहा,
मग दोन्ही पाय ताठ ठेवण्याऐवजी खांद्याच्या लांबीएवढे ताणा. मग डावा पाय डाव्या बाजूला आणि उजवा पाय उजव्या बाजूला मुडपा. आता गुडघे मुडपून ४५ डिग्री कोनात ठेवा. या दरम्यान पाठ एकदम ताठ ठेवा.
तसंच हात गुडघ्यांपासून थोडे वर ठेवत त्यांना आधार द्या. या अवस्थेत पाच सेकंद राहा. या दरम्यान जांघा एकदम ताणून ठेवा. पाच सेकंदांनंतर पुन्हा पूर्वस्थितीत या. हा व्यायाम तीस वेळा करा.
० बेडौल स्तनांसाठी :- जर तुमचे स्तन गरजेपेक्षा जास्त मोठे आणि बेडौल असतील, तर हा व्यायाम नक्कीच करून बघा…सगळ्यात आधी पोटावर झोपा. मग हातावर बळ देत शरीराला वर उचला. दोन्ही बाहुना ताण द्या.
शरीराला खालच्या बाजूस आणा आणि पुन्हा वर घेऊन जा. अगदी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण दंड मारतो. या दरम्यान तुमची हनुवटी जमिनीला टेकणार नाही.
खांदे जमिनीपासून एक फूट दूर ठेवा. हा व्यायाम करताना हात आणि पाठीला पूर्णपणे ताण ठेवा. हा व्यायाम साधारण दहा वेळा करा.
० लटकणाऱ्या पोटासाठी :- जर तुमचं पोट लटकत असेल, तर त्याला सपाट बनविण्यासाठी हा व्यायाम नक्कीच फायदेशीर ठरेल …सगळ्यात आधी पाठीवर झोपा.
नंतर दोन्ही हात खालच्या बाजूस ताठ ठेवत पाठीला आधार द्या. पाय तीन इंच वर उचला. जेवढं शक्य असेल तेवढे पाय फाकवा. मग पुन्हा ते अशापद्धतीने जवळ घ्या,
ज्याप्रमाणे आपण कात्री बंद करतो. कात्री ज्याप्रमाणे उघड-बंद होते, अगदी त्याप्रमाणेच तुम्हालाही पायाची हालचाल करायची आहे. फक्त जमिनीला स्पर्श करायचा नाही.
असं वीस वेळा करा. पहिल्यांदा करताना प्रत्येक पाच वेळा केल्यानंतर तीस सेकंद आराम करा आणि मग पुन्हा व्यायाम करण्यास सुरवात करा.
० जांघा सुडौल होण्यासाठी :- जर तुमच्या जांघा वरच्या बाजूस खूप जाड असतील, तर बाजूस खूप जाड असतील, तर बसण्यास नक्कीच त्रास होत असणार.
या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी हा व्यायाम करा… पहिल्यांदा ताठ उभे राहा, मग आपला डावा पाय पुढच्या बाजूस जेबढा शक्य आहे तेवढा घ्या,
तेव्हाच उजवा पाय जेवढा मागे नेणं शक्य आहे, तेवढा घेऊन जा. नंतर उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे, असं करत राहा. हा व्यायाम साधारण वीस वेळा करा.
० नितंब बेडौल असतील तर… नितंबांना सुडौल बनविण्यासाठी हा व्यायाम जरूर कर… पहिल्यांदा डाव्या कुशीवर झोपा, मग डाव्या कोपराने शरीराला आधार द्या. डाबा पाय ताठ गहु द्या.
मग उजवा पाय पुढच्या बाजूस घ्या. ९0 डिग्रीचा कीन बनवत पाय बर उचला. लक्षात ठेवा, उजवा पाय जमिनीला टेकता कामा नये.
तर, तो जमिनीपासून साधारण सहा इंच वर असायला हवा. असं उजव्या कुशीवर वळूनही करा. हा व्यायाम नितंबांची अनावश्यक चरबी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. असं ३0 वेळा करा.