Famous Aarti in India : कुटुंबासोबत ‘या’ 4 ठिकाणांच्या जगप्रसिद्ध आरत्यांना द्या भेट, व्हाल भक्तीमय…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Famous Aarti in India : भारताच्या संस्कृतीचा विचार केला तर मोठ्या प्रमाणात लोक हे देवाची भक्ती करत असतात. मग ती श्री कृष्णाची असो किंवा शंभू महादेवाची असो. लोकांचा देवाबाबत एक विशिष्ट रस आहे.

जर तुम्ही पाहिले तर अनेक ठिकाणी देवाची मंदिरे किंवा दरबार आहेत. त्या ठिकाणी देवाची महापूजा तसेच आरती होत असते. तिथे मोठ्या प्रमाणात भक्त गर्दी करत असतात. त्यामुळे देवाचा गाभारा हा भक्तांनी उजळून जातो.

अशा वेळी तुम्हीही तुमच्या कुटुंबासोबत देवाच्या गाभार्यात आरतीसाठी जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी 4 उत्तम ठिकाणे सांगणार आहे. ज्या ठिकाणी गेल्यावर तुम्ही भक्तिमय होऊन जाल, व तुमच्या मनाला शांती लाभेल. जाणून घ्या ही आरतीची ठिकाणे…

 

गंगा आरती

भारतातील गंगा आरती ही सर्वात मोठी आरती मानली जाते. भारताची गंगा आरती जगभर प्रसिद्ध आहे. हर की पौरी येथे गंगा आरती पाहण्यासाठी लाखो भक्त हरिद्वारला गर्दी करतात. गंगा आरतीचे दृश्य पाहून माणूस भक्तीच्या रसात तल्लीन होतो.

मात्र गंगा आरती पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. म्हणजेच गंगा आरतीचा लळा हा फक्त भारतातील लोकांनाच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. या आरतीचे नियोजन हरिद्वारच्या धर्तीवर ऋषिकेश, वाराणसी, प्रयाग  आणि चित्रकूटमध्ये गंगा आरतीचे आयोजन केले जात आहे.

महाकालेश्वर मंदिराची आरती

तुम्ही महाकालेश्वर हे नाव तर ऐकले असेलच. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आहे. अशा वेळी तुम्हला महाकालच्या आरतीचे असे रूप महाकालेश्वर मंदिरात पाहायला मिळते जे इतर कोठेही सापडणार नाही.

या मंदिरात अंत्यसंस्काराच्या चितेच्या अस्थीसह भगवान शंकराची पूजा केली जाते. महाकालेश्वर येथे दरवर्षी शिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. देश-विदेशातील लोक येथे भस्म आरती पाहण्यासाठी येतात. हे अनोखे दृश्य पाहून लोक भारावून जातात.

बांके बिहारीजींची आरती

मथुरेत होत असणारी बांके बिहारीजींची आरती ही खूप प्रसिद्ध आहे. या आरतीला मंत्रमुग्ध होण्यासाठी लाखो लोक हजर राहत असतात. हे मंदिर अतिशय सुंदर आणि भाविकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

येथील आरती अतिशय भव्य आणि मनमोहक आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या समोर एक दरवाजा आहे जो पडद्याने झाकलेला आहे. हा पडदा दर एक किंवा दोन मिनिटांनी बंद आणि उघडला जातो. येथील आरती पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक वृंदावनात येतात. यामुळे वृंदावन हे ठिकाण भाविकांसाठी खूप आवडीचे आहे.

केदारनाथची आरती

सध्या मोठ्या प्रमाणात लोक हे महादेवाचे भक्त असल्याचे पाहायला मिळते आहे. यासाठी दरवर्षी लाखो भाविक केदारनाथ या ठिकाणी जाऊन महादेवाचे दर्शन घेत असतात.

मात्र हे मंदिर पर्वत आणि नद्यांनी वेढलेले आहे. या खडतर प्रवासानंतरही लोक आरती पाहण्यासाठी येथे पोहोचतात. केदारनाथ धाम ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

सकाळी शिवपिंडाला नैसर्गिकरित्या स्नान करून त्यावर तूप लावले जाते. त्यानंतर अगरबत्ती लावून आरती केली जाते. यावेळी भाविकांना मंदिरात प्रवेश करून पूजा करता येते, मात्र सायंकाळी देवाला सजवले जाते. यावेळी भक्तांना दुरूनच ते पाहता येते. अशा वेळी केदारनाथला जाऊन महादेवाचे दर्शन घेण्याचे स्वप्न तरुण लोक पूर्ण करत आहेत.