Fixed Deposit : ‘ही’ बँक 445 दिवसांच्या FD वर देत आहे 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, बघा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fixed Deposit : सध्या बरेचजण एफडीमध्ये गुंतवणूक करत आहेत. एफडीमधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, म्हणूनच गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. तसेच येथील परतावा देखील जास्त आहे. जो गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. सध्या स्मॉल फायनान्स बँका एफडीवर जास्त परतावा देत आहेत. यातीलच एक म्हणजे इक्विटास स्मॉल फायनान्स बँक जी आपल्या गुंतवणूकदारांना सर्वात जास्त परतावा ऑफर करत आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने त्यांच्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात नुकताच बदल केला आहे. ही स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी FD वर 9 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन FD व्याजदर 21 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले आहेत. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू होतील. Equitas Small Finance Bank FD वर सामान्य जनता आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी किती परतावा देत आहे ते जाणून घेऊया.

सामान्य जनतेसाठी परतावा :-

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्यांना FD वर ८.५ टक्के व्याज देते. बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 3.5 टक्के व्याज देत आहे. बँक 30 ते 45 दिवसांच्या दरम्यानच्या FD वर 4 टक्के व्याजदर देते. याशिवाय, बँक एफडी धारकांना 46 ते 90 दिवसांच्या दरम्यान परिपक्व झालेल्या एफडीवर 4.5 टक्के ऑफर देत आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक 91 ते 180 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वर 5.25 टक्के व्याजदर देते. 181 ते 364 दिवसांच्या दरम्यान परिपक्व होणाऱ्या FD वर, बँक 6.25 टक्के व्याजदर देत आहे. एका वर्षात परिपक्व होणाऱ्या एफडीवर तुम्हाला ८.२ टक्के व्याज मिळेल.

एक वर्ष आणि एका दिवसात परिपक्व एफडीवर परतावा :-

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक एक वर्ष आणि एका दिवसात परिपक्व होणाऱ्या FD वर 8 टक्के व्याजदर देत आहे. बँक 367 ते 443 दिवसांच्या कालावधीतील FD साठी 8.2 टक्के व्याज दर देते आहे. तुम्हाला ४४४ दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर ८.५ टक्के व्याजदर मिळेल.

बँक 445 दिवस ते 18 महिन्यांच्या कालावधीतील FD साठी 8.2 टक्के व्याज दर देते. बँक 18 महिने आणि एक दिवस ते दोन वर्षांपर्यंत मुदत ठेवींवर 7.75 टक्के व्याज दर देते.