Diet Tips : पावसाळा आपल्यासोबत आनंद आणतोच पण सोबत अनेक आजारही घेऊन येतो. लहान मुले, प्रौढ आणि वृद्ध लोक या मोसमात सहज आजारी पडतात. या हंगामात संसर्ग खूप वेगाने पसरतो. पावसाळ्यात सहसा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, अशास्थितीत सर्दी, खोकला, ताप, मलेरिया अशा समस्या उद्भवू शकतात.
या सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी या मोसमात सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला येथे काही टिप्स देणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही पावसाळ्यात नोरोगी राहू शकता.
पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा
– पावसाळ्यात आहारात लसणाचा समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
– या मोसमात दही जास्त प्रमाणात घ्या कारण त्यामुळे शरीरात हानिकारक बॅक्टेरिया जाण्याचा धोका कमी होतो.
– शरीर उबदार आणि सुरक्षित ठेवण्यासाठी कॅफिनयुक्त पेयांऐवजी गरम पेयांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा.
– फक्त उकळलेले आणि स्वच्छ पाणी पिण्याचा प्रयत्न करा. कारण याच ऋतूमध्ये संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. थेट नळाचे पाणी पिणे टाळा.
– आले, तुळस, दालचिनी, काळी मिरी, वेलची आणि लवंग यांसोबत हर्बल गरम पाण्याने संसर्ग टाळण्यास मदत होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते.
– आहारात मिठाचे प्रमाण कमी करा. मिठामुळे पाणी टिकून राहते आणि उच्च रक्तदाब होतो ज्यामुळे पावसाळ्यात समस्या वाढू शकते.
– पावसाळ्यात कच्चे पदार्थ खाणे टाळा.
– या ऋतूमध्ये प्री-कट फळे, तळलेले अन्न, जंक फूड किंवा कोणतेही स्ट्रीट फूड खाणे पूर्णपणे टाळावे.