Chandra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषात चंद्राला विशेष स्थान देण्यात आले आहे. चंद्र देव मन, स्त्री आणि माता यांचा कारक मानला जातो. ज्याच्या कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत असते, त्या व्यक्तीचे मन शांत राहते. तसेच असा व्यक्ती सकारात्मक भावनांनी परिपूर्ण असतो. सुख, समृद्धी आणि संतती प्राप्त होते. मनोबलही वाढते. तसेच इतर अनेक लाभ मिळतात.
चंद्र देव कर्क राशीचा स्वामी आहे आणि ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच 21 जून रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल. काहींना फायदा तर काहींना तोटा होईल. पण अशा काही राशी आहेत ज्यासाठी हे संक्रमण खूप फायदेशीर ठरेल. आज आपण त्या राशींबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग…
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी गुंतवणुकीसाठी हा काळ खूप शुभ राहील. लोक तुमच्या बोलण्यावर प्रभावित होतील. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद संपतील. तुम्हाला मनःशांती मिळेल. तणावातून आराम मिळेल. उत्पन्न वाढेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांचा समाजात सन्मान वाढेल. व्यवसायात लाभ होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील. जीवनात आनंद मिळेल. या काळात तुम्ही काही मोठे निर्णय घेऊ शकता. यशाची शक्यता असेल. मात्र, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
कुंभ
चंद्राचे हे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव घेऊन येईल. प्रेमी युगुलांसाठी विवाहाची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होईल. कोर्टाशी संबंधित कामात यश मिळेल. संपत्तीत वाढ होईल. आरोग्यही चांगले राहील.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठीही चंद्राचे संक्रमण शुभ राहील. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस अनुकूल राहील. व्यवसायात लाभ होईल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. गुंतवणुकीसाठी हा दिवस शुभ राहील.