लाईफस्टाईल

चौदा वर्षीय मुलाने मसालेदार वेफर्स खाल्ल्याने त्याचा मृत्यू !

Published by
Ahmednagarlive24 Office

अमेरिकेत सध्या सोशल मीडियावर विचित्र प्रकारच्या चॅलेंजिसचे फॅड आले आहे. असे एक विचित्र चॅलेंज म्हणजे ‘वन चिप चॅलेंज’, तसे पाहिले तर एक वेफर खाणे हे काही धोकादायक नाही, असाच आपला समज आहे;

पण याच वन चिप चॅलेंजच्या नादात अमेरिकेतील एका १४ वर्षीय किशोरवयीन मुलाला जीव गमवावा लागला आहे. ही दुर्दैवी घटना अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्समधून समोर आली आहे. येथे एका चौदा वर्षीय मुलाने मसालेदार वेफर्स खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाला.

अमेरिकेतील तरुणाईमध्ये सध्या वन चिप चॅलेंज खूपच लोकप्रिय ठरले आहे. मोठ्या संख्येने तरुण हे चॅलेंज स्वीकारताना दिसत आहेत. हे चॅलेंज स्वीकारणाऱ्या स्पर्धकांना जगातील सर्वात मसालेदार टॉर्टिया चिप्स (वेफर्स) खायचे असतात. हे चीप्स खातानाचा आपला व्हिडीओ शूट करून तो सोशल मीडियावर शेअर करावा लागतो. हे चिप्स खाताना पाणीदेखील पिण्यास मनाई असते.

हॅरीस व्हालोबा या चौदा वर्षीय मुलाने हे चॅलेंज स्वीकारले. गेल्या शुक्रवारी त्याने या विचित्र स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र त्याला काही ते जहाल तिखट चिप्स पचवता आले नाही. चिप्स खाल्ल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

जगातील सर्वात मसालेदार टॉर्टिया चिप्स हे पाकी नावाच्या कंपनीचे उत्पादन आहे. काळ्या रंगाचे हे चिप्स शवपेटीच्या (कॉफीन) आकाराच्या डब्यांमध्ये येतात, त्यावर असा स्पष्ट इशारा छापलेला असतो की, हे चिप्स लहान मुलांनी खाऊ नयेत. हे केवळ वयस्कर लोकांसाठी आहेत.

Ahmednagarlive24 Office