उद्या श्रीगणेशाच्या स्थापनेत ‘हे’ सहा योग येतील जुळून, ‘या’ मुळे राहील सर्व शुभ-शुभ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

उद्या  शिव-पार्वती योगामध्ये गणेश उत्सवाची सुरुवात होईल. यावर्षी गणेश उत्सव काळात एक अमृतसिद्धी, दोन सर्वार्थसिद्धी आणि सहा रवी योग जुळून येणार आहे. 

श्रीगणेशाची स्थापना शिव-पार्वती योगामध्येच होईल. सोमवार महादेवाचा प्रिय दिवस आहे तसेच शुक्ल योग देव पार्वतीला प्रिय आहे. या दिवशी कन्या राशीमध्ये चंद्र राहील. हे सर्व शुभ योग सोमवारी राहणार आहे. 

2 आणि 3 सप्टेंबरला रवी योग, 4 सप्टेंबरला अमृतसिद्धी आणि रवी योग, 5 सप्टेंबरला सर्वर्थसिद्धी योग, 6 सप्टेंबरला रवी योग, 8 सप्टेंबरला सर्वार्थसिद्धी योग, 11 आणि 12 सप्टेंबरला रवी योग राहील.

रवी योगामध्ये सुरु करण्यात अडथळ्याशिवाय पूर्ण होते. अमृतसिद्धी योगामध्ये करण्यात आलेले कार्य सिद्धी प्रदान करणारे आणि सर्वार्थसिद्धी योगामध्ये कार्याची सुरुवात यश प्राप्त करून देते. 
श्रीगणेश मूर्ती आणण्यासाठी कोणतेही मुहूर्त नसतो. गणेशाचा जन्म माध्यान्ह काळात मनाला जातो,  यामुळे मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना माध्यान्हात करावी.

अहमदनगर लाईव्ह 24