गणपती हे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते. गणेशोत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा मानून त्याला सार्वजनिक रूप दिले.
घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेउन येतो. त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते.
कुठे बाप्पा संपुर्ण दहा दिवस, कुठे पाच दिवस, कुठे दिड दिवस तर कुठे अगदी एक दिवसाकरीता देखील येतो.
श्री गणरायाची मुर्ती ही मातीचीच असावी असा नियम आहे. शक्यतो शाडु मातीची मुर्ती बसवावी किंवा काळया मातीची देखील मुर्ती चालेल परंतु आजकाल सुबक आणि रेखीव म्हणुन प्लॅस्टर ऑफ पॅरीस च्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा जो प्रघात पडला आहे तो पर्यावरणाकरता हानिकारक आहे.
श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतांना पार्थिव मुर्तीचे आवाहन, पुजन, अभिषेक, अत्तर फुलं दुर्वा पत्री अर्पण करून अखेर नैवेद्य आणि आरती अशी प्रथा आहे.भाद्रपद महिन्यात पावसाचे दिवस असल्याने सगळीकडेच हिरवळ पसरलेली असते आणि विविध वनस्पती उगवलेल्या असतात. त्यामुळे सोळा पत्री श्री गणेशाला अर्पण करण्याची प्रथा असावी. भगवान गणेशाला दुर्वा प्रिय असल्याने त्यांच्या शिरावर वाहाण्याची प्रथा आहे.
पुराणात या सणाची माहिती घेतली असता असे समजते की माता पार्वतीला एकदा स्नानाकरता जायचे असतांना बाहेर कुणी पहारेकरी नसल्याने तिने मातीची एक मुर्ती बनवुन त्यात प्राण फुंकले त्याला पहारेकरी नेमुन ती स्नानाला गेली असता बाहेर भगवान शंकर आले.
पहारेकऱ्याने त्यांना रोखले असता त्यांनी संतापुन त्याचा शिरच्छेद केला. माता पार्वती स्नानाहुन आल्यानंतर झालेल्या प्रकाराने ती प्रचंड संतापली आणि क्रोधीत झाली.
तिचा क्रोध शांत करण्याकरता भगवान शंकराने आपल्या सेवकांना प्रथम जे कोणी दिसेल त्याचे शिर आणावयास सांगितले सेवक हत्तीचे शिर घेउन आले असता ते शिर त्या धडावर बसविण्यात आले.तो दिवस भाद्रपद महिन्यातला शुध्द चतुर्थीचा दिवस होता आणि तेंव्हापासुन श्री गणेशाचा उत्सव सुरू होण्याची प्रथा सुरू झाली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी भारतीयांना एकत्र आणण्याकरीता आणि विचारांची देवाणघेवाण करण्याकरीता या उत्सवाची सुरूवात केली होती. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येतं. अवघ्या भारतभर विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणामुळे कितीतरी हातांना रोजगार उपलब्ध होतो. कोटयावधीची उलाढाल होतांना आपल्याला दिसते.
गणेशाची शंकर व पार्वतीचा पुत्र म्हणून शिवहर,पार्वतीपुत्र अशे नावे पडली आहेत .तसेच द्वैईमतूर असेही संभोधले जाते.विविध ठिकाणी या देवतेचे वर्णन बदलत असले तरी सगळीकडे हिंदू धर्मानुसार हत्तीचे मुख व मनुष्याचे अंग असलेली देवता असेच आहे.या देवतेचे वाहन पुराणामध्ये काही ठिकाणी उंदीर व काही ठिकाणी सिंह वर्णिले आहे.
गणपती हा महाभारत या महान ग्रंथाचा लेखनिक होता.संपूर्ण भारतात गणेश पुज्यनीय असून विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
हा उत्सव महाराष्ट्रातील गणपती संदर्भामधील सर्वात मोठा सण आहे.दर वर्षी भारतीय पंचांगानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्या मध्ये भाद्रपदात महिन्याच्या शुक्ल पक्षापासून सुरु होतो. श्री गणेशाच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्या जातात.देवाला लाल रंगाची फुले फार आवडतात अशी आख्याईका आहे त्यामुळे देवाला लाल फुलांचा हार घातला जातो. मोदक तयार करून नैवद्य म्हणून देवाला दाखवले जातात.त्यानंतर गणेश आरती गायली जाते व सर्वाना गणपतीचा प्रसाद वाटप केले जाते.
दहा दिवस उत्सव चालतो आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीच्या विसर्जनाने हा उत्सवाची सांगता होते. पेशव्यांच्या काळात हा उत्सव फक्त घरगुती स्वरूपात साजरा केला जायचा परंतु इ.स.१८९३ साली लोकमान्य टिळकांनी सर्व लोक एकत्र यावेत म्हणून हा उत्सव सार्वजनिक साजरा करण्याची प्रथा चालू केली.सुरुवातीला सनातनी व सुधारक लोकांनी टिळकांवर खूप टीका केली पण नंतर सर्वानी या गणेशाच्या सार्वजनिक स्वरूपाला मान्यता दिली.
मुंबई व पुण्यात हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.पुण्यात पाच मानाचे गणपती आहेत.तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग,कसबा पेठ आणि केसरी वाडा. या व्यतिरिक्त दगडूशेठ हलवाई, बाबू गेनू, मंडई, आणि जिलब्या मारुती ही आणखी काही मोठी मंडळे आहेत. भव्य देखाव्यासाठी पुण्यातील हिरा बाग मंडळ प्रसिद्ध आहे.मुंबईमधील लालबागचा राजा मंडळ सर्वात प्रसिद्ध मंडळ असून सर्वात मानलेला गणपती आहे.
अनंत चतुर्दशी ला आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जना वेळी प्रत्येक मन भावुक झाल्याचं दिसतं. दहा दिवस एखादा पाहुणा आपल्या घरी यावा आणि दहाव्या दिवशी तो परत निघावा असं होउन जातं.
तो दिवस सगळयांकरताच मोठया जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देण्याचा आणि कठीण क्षण असतो. पावलं जड होतात . . . लहानं बच्चेकंपनी तर अक्षरशः रडतांना देखील दृष्टीस पडते.
“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” हा जयघोष आसमंतात घुमत असतो. आणि पाठमोरी बाप्पाची मुर्ती पाण्यात जातांना मनात कालवाकालव होते.