Numerology : जोडीदारावर खूप प्रेम करतात ‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली, वाचा त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी!

Content Team
Published:
Numerology

Numerology : प्रत्येक व्यक्तीचे जीवन त्याच्या कुंडलीत उपस्थित असलेल्या नऊ ग्रहांद्वारे चालते. हे ग्रह बरोबर राहिल्यास माणसाचे जीवन आनंदाने भरून जाते. त्याचबरोबर जर ग्रहांची स्थिती चांगली नसेल तर माणसाच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या जाणवतात.

जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचे आयुष्य आणि भविष्याबद्दल जाणून घ्यायचे असते तेव्हा त्याची कुंडली पाहिली जाते. कुंडली ही जन्मवेळ, जन्मतारीख, इत्यादींच्या आधारे बनवली जाते.

जन्मकुंडली व्यतिरिक्त अंकशास्त्राद्वारे देखील व्यतींबद्दल सर्व माहिती मिळते. अंकशास्त्रामध्ये संख्यांच्या आधारे व्यक्तीबद्दल सर्वकाही जाणून घेता येता. अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेवरून एक संख्या शोधली जाते तिला मूलांक संख्या असे म्हणतात, जन्मतारखेची बेरीज करून ही संख्या काढली जाते.

आज आपण अंकशास्त्राद्वारे 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत. या लोकांचा स्वभाव, व्यक्तिमहत्व कसे आहे ते आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींची मूलांक संख्या 2 असते, ही मूलांक संख्या जन्मतारखेची बेरीज करून काढली जाते, या मूलांक संख्याच्या आधारे आज आपण या व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत.

मूलांक 2

-या मूलांक क्रमांकाच्या मुली स्वभावाने भावनिक असतात. त्यांच्याशी संबंधित प्रत्येक नात्याला त्यांचा भावनिक स्पर्श असतो. ती तिच्या जोडीदाराबद्दल थोडी भावूकही असते.

-प्रेमाच्या बाबतीत ते थोडे हट्टी असतात. एकदा ते एखाद्याच्या प्रेमात पडले की त्यांना आयुष्यभर त्यांचे राहायचे असते.

-त्यांच्यासाठी सर्वात मोठे प्राधान्य म्हणजे त्यांचे प्रेम आणि जोडीदार. याच कारणामुळे त्यांच्यात प्रेमविवाह होण्याची शक्यता जास्त आहे.

-ते त्यांच्या जोडीदाराशी इतके जोडलेले असतात की घरच्यांनी त्यांना साथ दिली नाही तरी ते प्रत्येक गोष्टीच्या विरोधात जाऊन जोडीदारासोबत राहतात आणि लग्नही करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe