लहान मुलांना ज्युस देताय? काळजी घ्या, कारण ‘या’ वयापर्यंत ज्युस देऊ नये असं अभ्यासकांनी सुचवलंय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

फळांचा ज्यूस हा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी पोषक ठरतो. परंतु अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या मते, विशिष्ट वयापर्यंत ज्यूस न दिलेलाच चांगला असतो.

त्यांच्या मते, 12 महिने म्हणजे एक वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ज्युस अजिबात देऊ नये.

कारण याचा त्यांना काहीच फायदा होत नाही. एक वर्षानंतर मुलांना हळूहळू ज्युस देणं सुरू करावं.

परंतु तोही रस घरच्या घरी तयार केलेला असावा. फळांपेक्षा भाज्यांचा रस देणे इष्ट ठरते.

रात्री झोपण्यापूर्वी मुलांना फ्रुट ज्युस बिलकुल देऊ नका.

यामुळे पोट फुगणं, गॅस, अपचन अशा समस्या उद्भवू शकतात असही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

तसेच दिवसाला 60 से 120 मि.लीपेक्षा जास्त ज्युस देऊ नये.

एफडीएच्या मते, मुलांना ज्युस उकळून देऊ नका, यामुळे त्यातील चांगल्या बॅक्टेरियांचा नाश होतो.

त्यांना चमच्याने ज्युस पाजा किंवा कपातून ज्युस द्या.

अहमदनगर लाईव्ह 24