Lakshmi Narayan Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो आणि या काळात जर दोन किंवा अधिक ग्रह एका राशीत आले तर राजयोग किंवा दुर्मिळ योगायोग तयार होतो. असाच एक योगायोग मे-जूनमध्ये मेष आणि वृषभ राशीत बुध-शुक्र यांचा संयोग होणार आहे.
सध्या सुख, संपत्ती आणि वैभवाचा कारक शुक्र मेष राशीमध्ये स्थित आहे, अशातच ग्रहांचा राजकुमार बुध देखील 10 मे रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे, या दोन ग्रहांच्या एकत्र येण्याने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. मेष राशीत हे दोन ग्रह एकत्र आल्याने 4 राशींना खूप फायदा होणार आहे. कोणत्या आहेत राशी चला पाहूया…
मिथुन
बुध शुक्र आणि लक्ष्मी नारायण राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. उया काळात उत्पन्न वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुम्हाला शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो. व्यावसायिकांना मे महिन्यात काही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
मेष
शुक्र बुध आणि लक्ष्मी नारायण राजयोग लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतात. करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात पैशाच्या गुंतवणुकीचे फायदे मिळतील. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. अविवाहित लोकांसाठी नात्याचा प्रस्ताव येऊ शकतो. बेरोजगारांसाठी नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळू शकते. नोकरदारांना बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होईल आणि नवीन स्त्रोत निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल, सध्या गुरू देखील मेष राशीमध्ये स्थित आहे, अशा स्थितीत गुरूचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल.
तूळ
बुध, शुक्र आणि लक्ष्मी नारायण राजयोगाचा योग तूळ राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान सिद्ध होऊ शकतो. तुम्हाला बुध ग्रहाचा आशीर्वाद मिळेल. या काळात काही चांगली बातमी मिळू शकते. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. नोकरीच्या ठिकाणीही बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठीही काळ चांगला राहील. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर त्यासाठी वेळ उत्तम आहे.
कर्क
शुक्र, बुध आणि लक्ष्मी नारायण राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. आर्थिक बाजू मजबूत होईल. बेरोजगारांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो. कौटुंबिक संबंध मजबूत होतील, आर्थिक स्थिती सुधारेल, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांना परदेशात पाठवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या काळात गुंतवणुकीचे फायदे होतील. राजकारणात सक्रिय लोकांसाठी काळ उत्तम राहील.
लक्ष्मी नारायण राजयोग म्हणजे काय?
ज्योतिष शास्त्रात लक्ष्मी नारायण राजयोगाला विशेष महत्त्व दिले गेले आहे, जेव्हा बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह कोणत्याही राशीत एकत्र असतात तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो, या योगाने लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो, धनधान्यांचा वर्षाव होतो.