अहमदनगर लाईव्ह24 टीम :- उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते ती तुमची मानसिक शांती… अनावश्यक किंवा ज्या इतक्या गरजेच्या नसतील अशा कार्यांना थोडे दूर ठेवलं तर तुम्ही हाच वेळ तुमच्या स्वत:साठी वापरू शकता.
अनेकदा आपण कोणत्या तरी गोष्टीच्या परिणामांबद्दल किंवा भयानक गोष्टींबद्दल विचार करून करून आपली तब्येत बिघडवून घेतो.
यातील अनेक परिणाम हे केवळ काल्पनिक असतात… ‘असं झालं तर तसं झालं तर…’ या गोष्टींना गरजेपेक्षा जास्त महत्त्व द्यायला नाही पाहिजे.
आपल्या निर्णयांचा आणि परिणामांचा लवकरात लवकर सामना करावा आणि निष्कर्षावर पोहोचावे. तुम्ही फक्त विचारच करत राहाल तर वाईट विचारही येतच राहतील आणि तुम्हाला तणावातून बाहेर पडणे आणखीनच कठीण होईल.
यामुळे तुमची तब्येतही बिघडू शकते. चिंतन प्रक्रियेला मजबूत करायचे असेल तर सलग काही तरी गोष्टींचा विचार करणे बंद करा. जेव्हा गरज असेल तेव्हाच मेंदूला ताण द्या आणि त्याला सक्रिय ठेवा.
पण गरज नसेल तेव्हा अनावश्यक गोष्टींचा विचार टाळून मेंदूला शांतता द्या. यामुळे तुमच्या मेंदूच्या शक्तीत वाढच होईल आणि तुमच्या आरोग्यावरही याचा परिणाम जाणवणार नाही.
स्वस्थ जीवनासाठी तुमच्या मेंदूला आराम देणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी योगासन महत्त्वाचे ठरतात. योगासनांच्या साहाय्याने मेंदूला आणि बुद्धीला शांत ठेवता येऊ शकते.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com