Grah Gochar : हिंदू धर्मात ग्रहांना विशेष महत्व आहे. जेव्हा ग्रह आपली राशी बदलतात तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो, अशातच शुक्र 3 नोव्हेंबरला कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सध्या शुक्र सिंह राशीत आहे. अशा स्थितीत काही राशींवर याचा परिणाम दिसून येणार आहे. शुक्र ग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर २९ नोव्हेंबरपर्यंत राहील.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला सुख, वैभव, सौंदर्य, ऐश्वर्य आणि प्रेमाचे कारण मानले जाते. कुंडलीत शुक्राच्या मजबूत स्थितीमुळे व्यक्तीच्या जीवनात कधीही धन-समृद्धीची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर सामाजिक आदरही वाढतो. अशातच शुक्राच्या या संक्रमणाचा फायदा या तीन राशींना होईल. या काळात त्यांच्यावर लक्ष्मी देवीची विशेष कृपा राहील. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ३ नोव्हेंबरपासून शुभ दिवस सुरू होतील. या काळात उत्पन्न वाढू शकते. आनंदाची बातमी मेलू शकते. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात सुख-शांती राहील. परदेश दौऱ्याचे बेत आखले जातील. परदेश दौऱ्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांनाही शुक्राच्या संक्रमणाचा फायदा होईल. या काळात आर्थिक लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. 29 नोव्हेंबरपर्यंतचा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय शुभ राहील. विवाहाची शक्यता आहे.
कर्क
कन्या राशीतील शुक्राचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी देखील खूप शुभ राहील. या काळात नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला फायदा होईल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. कुटुंबात समृद्धी येईल. संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होईल. या काळात तुम्ही आनंदी राहाल.