Grah Gochar : ऑगस्ट महिन्यात ‘या’ तीन राशींसाठी अतिशय अशुभ योग; सावधगिरीचा इशारा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Grah Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा ग्रह आणि त्यांच्या हालचाली बदलतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. काहीवेळेला ते शुभ असतात तर काहीवेळेला अशुभ. अशातच सूर्य कर्क राशीत प्रवेश करत असल्यामुळे महादरिद्र योग तयार होत आहे. १७ ऑगस्टपर्यंत सूर्य या स्थितीत राहील. ज्याचा काही राशींवर परिणाम होणार आहे.

याचा काही राशीच्या लोकांवर अशुभ प्रभाव दिसून येणार आहे. तसेच त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी देखील येऊ शकतात. या काळात या लोकांना धनहानी देखील होऊ शकते. चला जाणून घेऊया येणाऱ्या काळात कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे.

कन्या

कन्या राशीच्या लोकांवर महादरिद्र योगाचे दुष्परिणाम होतील, त्यामुळे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. या काळात आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. विचार करूनच एखाद्याला कर्ज द्या किंवा गुंतवणूक करा. या काळात या लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी येणारे काही दिवस खूप कठीण जाणार आहेत. करिअरमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. तरी या दिवसांमध्ये विचारपूर्वक पैसे खर्च करा.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी 17 ऑगस्टपर्यंतचा काळ अडचणींचा असेल. करिअर आणि आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. या काळात वादविवाद टाळा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.