Chaturgrahi Yog In Makar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर भ्रमण करतो, या काळात दोन किंवा अधिक ग्रह एका राशीत आले तर राजयोग आणि संयोग आणि शुभ-अशुभ योग तयार होतात.
ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो. अशातच फेब्रुवारी महिन्यात मकर राशीत ग्रहांचा मेळावा होणार असून, मकर राशीत चतुर्ग्रही योग तयार होणार आहे.
सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र एकत्र मकर राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या ग्रहांचा राजा सूर्य, ग्रहांचा राजकुमार बुध आणि ग्रहांचा सेनापती मंगळ मकर राशीत विराजमान आहे.
12 फेब्रुवारीला वैभव आणि संपत्ती देणारा शुक्र देखील मकर राशीत प्रवेश करेल, अशा स्थितीत मकर राशीमध्ये चतुर्ग्रही योग तयार होईल ज्यामुळे 4 राशींचे भाग्य सुधारेल. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
मकर
मकर राशीत 4 ग्रहांचे आगमन खूप भाग्यवान ठरणार आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. उत्पन्न वाढेल आणि नवीन स्रोतही निर्माण होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. करिअर आणि व्यवसायासाठी वेळ चांगला राहील.
तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता, काही मोठी डील फायनल होऊ शकते, आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे.जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील आणि नोकरी मिळण्याची प्रबळ शक्यता आहे.
मेष
मकर राशीत 4 ग्रहांचा संयोग आणि चतुर्ग्रही योग मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. नशीब तुमच्या बाजूने राहील. करिअर आणि बिझनेससाठी वेळ चांगला राहील. बेरोजगारांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल.
व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. धार्मिक कार्यात रुची वाढेल. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यवसायातही तुम्हाला मोठे यश मिळेल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यश मिळू शकते.
तूळ
4 ग्रहांचा संयोग आणि चतुर्ग्रही योग राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नोकरदार लोकांना अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्ही एखादे वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता.
करिअर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. जे लोक रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग आणि प्रॉपर्टीशी संबंधित काम करतात त्यांना चांगला नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही लाभ मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.