Hanuman Jayanti 2024 : यावर्षी हनुमान जयंती उत्सव 23 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा दिवस खूप खास असणार आहे. कारण या काळात ग्रहांचा अद्भुत संयोग घडत आहे. मीन राशीत पाच ग्रह एकत्र येणार आहे. ग्रहांच्या मिलनामुळे पंचग्रही योग तयार होत आहे. तसेच मेष राशीत बुधादित्य योग आणि कुंभ राशीत शश राजयोग तयार झाला आहे. अनेक राशींना ग्रहांच्या या शुभ संयोगाचा फायदा होणार आहे.
या काळात बजरंगबली यांच्या विशेष आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. तसेच अनेक राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळेल. तसेच संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे पाहुयात.
वृश्चिक
यावेळची हनुमान जयंती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खास असेल. करिअर आणि बिझनेसमध्ये भरपूर फायदा होईल. विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आयुष्यात येणाऱ्या अडचणी कमी होतील.
मेष
मेष राशीच्या लोकांवर बजरंगबलीची विशेष कृपा असेल. नोकरीच्या ठिकाणी लाभ होईल. उत्पन्न वाढेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कोर्टाच्या कामात यश मिळेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना 23 एप्रिलला फायदा होईल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. व्यवसायात लाभ होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ राहील.
मिथुन
हनुमान जयंतीच्या दिवशी मिथुन राशीचे लोक भाग्यवान ठरतील. यशाची शक्यता असेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यवसायात लाभ होईल.