लाईफस्टाईल

Guava Leaf Tea Benefits : फक्त पेरुच नव्हे तर पानेही आहेत खूप फायदेशीर; वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Guava Leaf Tea Benefits : पेरूचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पेरू मध्ये व्हिटॅमिन सी आहे, या घटकामुळे शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी व लढण्यासाठी खूप मदत होते, पेरू आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर आहेच, पण तुम्हाला माहिती आहे का? पेरूची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. होय, पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, लोह, प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक असतात.

पेरूच्या पानांपासून बनवलेल्या चहाचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. त्याचे नियमित सेवन केल्याने अनेक गंभीर आजार बरे होऊ शकतात. दरम्यान, आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला पेरूच्या पानांचा चहा पिण्याचे फायदे सांगणार आहोत.

पेरूच्या पानांचा चहा पिण्याचे फायदे :-

-पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. या चहाचे नियमित सेवन केल्यास अनेक गंभीर आजार आणि संसर्ग टाळता येतात.

-पेरूच्या पानांचा चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण, त्यात अनेक प्रकारचे एन्झाइम असतात, जे पचनाच्या वेळी कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करतात. याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, ज्यामुळे मधुमेहामध्ये फायदा होतो.

-पेरूच्या पानांचा चहा पचनासाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये असलेले घटक पचनक्रिया सुधारतात. याच्या सेवनाने गॅस, अपचन आणि अ‍ॅसिडिटी सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

-उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येमध्ये पेरूच्या पानांचा चहा सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात. याच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

-जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर पेरूच्या पानांचा चहा घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यात बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स असतात, जे शरीरात कार्बोहायड्रेट्सचे शोषण रोखण्यास मदत करतात. याच्या सेवनाने शरीरातील साखर आणि कॅलरीजचे प्रमाण वाढत नाही, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

प्रेरूच्या पानांचा चहा बनवण्याची पद्धत :-

पेरूच्या पानांचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम पातेल्यात पाणी टाकून गरम करा. आता त्यात 4-5 ताजी पेरूची पाने टाका आणि 2 ते 4 मिनिटे उकळा. नंतर हा चहा गाळून त्यात मध मिसळून प्या.

Ahmednagarlive24 Office