लाईफस्टाईल

Rajyog 2024 : 12 वर्षांनंतर जुळून आलाय ‘गुरु आदित्य राजयोग’, ‘या’ तीन राशींना होणार फायदा!

Published by
Ahmednagarlive24 Office

Rajyog 2024 : प्रत्येक ग्रह आपल्या वेळेनुसार राशी बदलत असतो. अशातच सूर्य 14 मे रोजी आपली राशी बदलणार आहे. सूर्य ग्रहाचे हे संक्रमण एक अत्यंत दुर्मिळ योग तयार करणार आहे, ज्याचा फायदा सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. 14 मे रोजी वृषभ राशीमध्ये गुरु आणि सूर्याचा संयोग तयार होत आहे. त्यामुळे जवळपास 12 वर्षांनंतर “गुरु आदित्य राजयोग” तयार होत आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रात दोन्ही ग्रहांचे विशेष महत्त्व आहे. दोन्ही ग्रह एकमेकांचे मित्र मानले जातात. ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला संक्रमण करतो. त्याच वेळी, गुरूचे संक्रमण 12.5 महिन्यांनी होते.

सूर्यदेव आत्मा, उच्च स्थान, आदर इत्यादींचे प्रतीक आहे. तर गुरु ज्ञान, भाग्य, विवाह, संपत्ती इत्यादींचा कारक मानला जातो. अशा स्थितीत या दोन मोठ्या ग्रहांच्या मिलनाने तयार झालेला हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो आहे. या राजयोगाचा फायदा सर्व राशींना होणार असला तरी देखील अशा तीन राशी आहेत ज्यांना सर्वाधिक याचा लाभ मिळणार आहे.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना या राजयोगाचा खूप फायदा होणार आहे. या काळात सिंह राशीच्या लोकांचा आदर वाढेल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. संपत्ती आणि समृद्धीमध्येही वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. करिअरसाठीही हा योग शुभ राहील. यश मिळण्याची दाट शक्यता असेल. भौतिक सुखसोयीही वाढतील.

मेष

मेष राशीच्या लोकांनाही गुरु आदित्य योगाचा फायदा होईल. या काळात संपत्तीत वाढ होईल. आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळेल. परोपकारातून लाभ होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. पद, प्रतिष्ठा आणि मान-सन्मानही वाढेल.

मीन

सूर्य आणि गुरूच्या संयोगाने तयार होणारा राजयोग मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. जीवन आनंदी येईल. प्रवासाची शक्यता आहे. आदर वाढेल. पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल.

Ahmednagarlive24 Office