Guru Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि कुंडलीला खूप महत्व आहे. ग्रह जेव्हा-जेव्हा हालचाल करतात तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. ग्रहांमध्ये देव गुरु बृहस्पति आणि मंगळाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. जेव्हा या ग्रहांच्या हालचालींमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर दिसून येतो.
बृहस्पति गुरु हा ज्ञान, बुद्धिमत्ता, अध्यात्म, शिक्षण, संपत्ती, धर्माचा कारक मानला जातो आणि मीन राशीचा स्वामी धनु असतो. बृहस्पति गुरुला एका राशीतून दुस-या राशीत जाण्यासाठी सुमारे 13 महिने लागतात. तर मंगळ हा जमीन, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मानला जातो. कुंडलीत मंगळाची स्थिती बरोबर असेल तर जीवनात सुख-समृद्धी येते, प्रत्येक क्षेत्रात यश, मान-सन्मान, कीर्ती मिळते, अशा स्थितीत 2024 मध्ये पुन्हा एकदा मंगळ आपला मार्ग बदलेल, यास्थितीत 4 राशींवर त्याचा परीणाम दिसून येणार आहे.
सध्या गुरू मेष राशीमध्ये वक्री वाटचाल करत आहे आणि 31 डिसेंबर रोजी गुरू मार्गी होईल, जे 3 राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. यानंतर 1 मे 2024 रोजी दुपारी गुरू मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करेल. 28 डिसेंबर 2023 रोजी मंगळ वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनु राशीत प्रवेश करेल, अशा स्थितीत मंगळाच्या राशीत होणारा बदल 4 राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे.
मेष
डिसेंबरच्या शेवटी गुरू मार्गी असल्यामुळे मेष राशीच्या लोकांना त्याचा फायदा होईल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि वेळ उत्तम राहील. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच या राशीच्या लोकांना काही कारणास्तव समाजात मान-सन्मान वाढून त्यांना प्रतिष्ठा मिळेल. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. नोकरी बदलण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. मे 2024 मध्ये वृषभ राशीत गुरुचे संक्रमण अचानक संपत्ती, गुंतवणूक नफा आणि सर्व भौतिक सुखांमध्ये वाढ करू शकते.
धनु
गुरूची सरळ चाल या राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरू शकते. 2024 मध्ये गुरु ग्रहाचा आशीर्वाद राहील. या काळात मुलांची प्रगती होऊ शकते. प्रेमसंबंधात यश मिळू शकते, लग्नाची चर्चा होऊ शकते. जमीन, वाहन आणि कौटुंबिक सुख मिळेल. सर्व भौतिक सुखे मिळू शकतात. तुम्ही काही चैनीच्या वस्तू देखील खरेदी करू शकता. धनु राशीतील मंगळाचे संक्रमण धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वास वाढवेल. नोकरदार लोकांनसाठी ही वेळ उत्तम असेल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुचा येणार काळ खूप चांगला मानला जात आहे. 2024 पासून सुवर्णकाळ सुरू होईल. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकते. नशीब तुमच्या बाजूने असण्याची शक्यता आहे. तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम जाणवतील. नोकरी- व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभ आणि नोकरीत असलेल्यांना पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळू शकते. एकूणच ही वेळ तुमच्यासाठी उत्तम मानली जात आहे.
वृश्चिक
डिसेंबरच्या शेवटी मंगळाच्या राशीत होणारा बदल तुमच्यासाठी लाभदायक असू शकतो. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन वर्षात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल. लोकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल. तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल.