Hair Growth Foods : हिवाळयात केसांशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. याचे मुख्य कारण असे असू शकते की या ऋतूमध्ये हवेत ओलावा नसल्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. केसांच्या समस्या केवळ लुकच खराब करत नाहीत तर आत्मविश्वासही कमी करतात. सामान्यतः इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.
केसांची काळजी घेणे म्हणजे बाजारात उपलब्ध असलेली महागडी उत्पादने वापरणे किंवा पार्लरमध्ये जाऊन केसांचे महागडे उपचार करणे असा होत नाही. केस निरोगी ठेवण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे. आज आपण केसांना मजबूत बनवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे, याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग…
केस निरोगी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
अंडी
केसांसाठी अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. केसांच्या वाढीसाठी प्रथिने सर्वात महत्वाचे आहेत. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि झिंक देखील असते जे केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने केस मऊ आणि चमकदार होतात.
पालक
पालक फक्त त्वचेसाठी फायदेशीर नाही, तर केसांसाठीही ते खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि आयर्न चांगले असते जे केस वाढण्यास आणि मजबूत करण्यास मदत करते. पालकाच्या पानांचे रोज सेवन केल्याने विशेषतः हिवाळ्यात केस मजबूत होतात. पालकाचे सेवन अनेक आरोग्य समस्यांवर मात करते.
रताळे
थंडीचा हंगाम येताच बाजारपेठेत रताळे मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात. रताळे आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जाते. त्यात बीटा कॅरोटीन आढळते. हे केस निरोगी ठेवण्यास मदत करते आणि केस गळणे देखील थांबवते. यामुळे तुमचे केस दाट होण्यास मदत होते.
अक्रोड
केसांसाठी अक्रोडचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते, याच्या सेवनाने केस मजबूतच होत नाहीत तर यामुळे केसांची वाढ देखील लवकर होते.