Hartalika Teej 2023 : यावेळी 18 सप्टेंबर रोजी हरतालिका तीजचा उपवास केला जाणार आहे. महिलांसाठी या व्रताचे विशेष महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी हा उपवास करतात. यावेळी हरतालिका तीजवर अनेक शुभ संयोग निर्माण होत आहेत. चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होत आहे.
याशिवाय आंद्र योग, रवि योग, बुद्ध आदित्य योग आणि चित्रा नक्षत्रही तयार होत आहेत, ज्यामुळे या व्रताचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. या शुभ संयोगाचा सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव पडणार आहे. पण यावेळी हरतालिका तीज काही राशींसाठी खूप शुभ मानली जात आहे, या दिवशी या राशीच्या लोकांवर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादांचा वर्षाव होईल. तसेच त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास मानला जात आहे. चला कोणत्या आहेत त्या राशी पाहूया…

‘या’ राशींवर असेल भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद
वृषभ
यावेळची हरतालिका तीज वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. या दिवशी या राशींच्या लोकांवर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादांचा वर्षाव होईल. तसेच या काळात आर्थिक लाभ होण्याची देखील दाट शक्यता आहे. तसेच उभा काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी 18 सप्टेंबर हा दिवस अतिशय शुभ मानला जात आहे. या काळात प्रेमसंबंधात गोडवा राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. तसेच कुटूंबाकडून सहकार्य मिळेल.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी हरतालिका तीजचा दिवस खूप शुभ असणार आहे. या काळात तुमचा समाजात मान-सन्मान वाढेल. व्यवसायात फायदा होऊ शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा करा चांगले फळ मिळेल.
मेष
मेष राशीच्या लोकांना या दिवशी भाग्याची साथ मिळेल. तसेच वैवाहिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात लाभाची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो.
कर्क
कर्क राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात रुची वाढेल. प्रवासाचे बेत आखता येतील. यातून तुम्हाला फायदा होईल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.