सातबारा उताऱ्यावरील नाव क्षेत्रांमधील चूक बदलण्याची मोहीम राज्यभर सुरू असून, त्यासाठी जमीन मालक ऑनलाइन अर्ज करीत आहेत. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत ७ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत.
सर्वाधिक पुणे जिल्ह्यातून आले आहेत. अर्जाबाबत सुनावणी घेऊन, त्यातील बदलांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश तहसीलदारांना देण्यात आले.
सातबारा दुरुस्तीसाठी आलेले अर्ज तहसीलदारांच्या पातळीवर प्रलंबित असून, ते लिखित स्वरूपात असल्याने प्रलंबित राहिले. आता ऑनलाइन दिलेले अर्ज किती स्वरूपात प्रलंबित आहेत, याचे रेकॉर्ड ठेवणे शक्य आहे.
नागरिकांनी ‘ई हक्क’ पोर्टलवरून सातबारा-फेरफारवर क्लिक करून अर्ज करावा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.