लाईफस्टाईल

अमेरिकेतील नोकरी सोडून गावात आला, कसलेही कर्ज न घेता उभी केली ३९ हजार कोटींची कंपनी

Published by
Ahmednagarlive24 Office

Sridhar Vembu Success Story : जवळजवळ प्रत्येक आयटी इंजिनीअर अमेरिकन कंपनीत नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहतो. पण काही लोक आयटी प्रोफेशनल्स, पगार आणि गुणवत्तेवर समाधानी नसतात.

आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीची यशोगाथा सांगणार आहोत, ज्याने अमेरिकेतील आपली चांगली नोकरी सोडून गावात येऊन हजारो कोटींची कंपनी उभी केली.

ज्याची यशोगाथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याचं नाव श्रीधर वेंबू आहे, ते झोहो कंपनीचे संस्थापक आहेत. सामान्य कर्मचारी म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि कोणत्याही फंडींगशिवाय त्यांनी ३९ हजार कोटी रुपयांची फर्म उभी केली.

तामिळनाडूचे रहिवासी असलेले श्रीधर वेंबू एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण तमिळ भाषेत पूर्ण केले. १९८९ मध्ये त्यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर ते पीएचडीसाठी अमेरिकेला रवाना झाले. त्यांनी अमेरिकेत पीएचडी केली. त्याचबरोबर त्यांनी कामही केले. त्यानंतर ते मायदेशी परतले. श्रीधर वेंबू यांना स्वत:चा व्यवसाय करायचा होता.

श्रीधर वेंबू यांनी १९९६ मध्ये आपल्या भावासोबत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फर्म अॅडव्हेंटनेट ची सुरवात केली. २००९ मध्ये त्यांनी कंपनीचे नाव बदलले आणि या कंपनीचे नाव बदलून झोहो कॉर्पोरेशन करण्यात आले. ही कंपनी सॉफ्टवेअर सोल्यूशन सेवा पुरवते. त्यांनी आपला व्यवसाय करण्यासाठी कोणतेही महानगर निवडले नाही, तर त्यांनी तामिळनाडूच्या तेनकाशी जिल्ह्यात आपली कंपनी स्थापन केली.

श्रीधर वेंबू हे झोहो कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक आणि सीईओ आहेत. एका रिपोर्टनुसार, कंपनीचा रेवेन्यू 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त म्हणजे ३९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा पद्धतीने त्यांनी स्वकष्टातून व जिद्दीतून एक मोठी हजारो कोटींची कंपनी उभी केली.

Ahmednagarlive24 Office