Health Benefits of Chia Seeds : चिया सीड्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर मनाली जाते. याच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. चिया सीड्स मध्ये अनेक आरोग्यदायी पोषक घटक आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचे असतात. यामध्ये व्हिटॅमिन-बी1, प्रोटीन, फॅट, फायबर, लोह, कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक यामध्ये आढळतात, जे शरीराला अनेक फायदे देतात.
आहारतज्ञ देखील निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी याला आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी चिया सीड्सचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते तसेच पचनसंस्था देखीलनिरोगी राहते. लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांसाठीही याचे सेवन खूप फायदेशीर आहे.
कारण यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते आणि त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की सकाळी रिकाम्या पोटी चिया सीड्सचे सेवन कसे करावे? आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.
-निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही चिया सीड्स पाण्यात भिजवून त्याचे सेवन करू शकता. यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा चिया बिया भिजवा. आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. चिया सीड्स रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो.
-तुम्ही चिया सीड्स आणि लिंबूचे देखील एकत्र सेवन करू शकता. हे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. या दोन्हींचे एकत्र सेवन केल्यास आरोग्यास अनेक फायदे मिळू शकतात. यासाठी एका ग्लास पाण्यात एका लिंबाचा रस मिसळा. त्यात एक चमचा चिया सीड्स आणि एक चमचा मध मिसळून प्या. याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्ही कमी आजारी पडता.
-बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी ऍपल सायडर व्हिनेगरचे सेवन करतात. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात चिया सीड्स घालून त्याचे सेवन करू शकता. यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा ऍपल व्हिनेगर आणि २ चमचे चिया बिया टाका आणि अर्धा तास तसंच ठेवा. नंतर त्याचे सेवन करा. हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये मदत करू शकते. याच्या नियमित सेवनाने हृदयाशी संबंधित गंभीर आजारांचा धोका कमी होण्यासही मदत होते.
-बरेच वजन कमी करण्यासाठी देखील चिया सीड्सचे सेवन करतात. पण तुम्हाला माहित आहे का की, चिया सीड्स वजन वाढवण्यासही मदत करतात. जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही दुधासोबत चिया सीड्सचे सेवन करू शकता. यासाठी एक ग्लास दुधात एक चमचा चिया सीड्स टाका आणि रात्रीभर तसेच ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दूध आणि चिया सीड्स उकळवूनही त्याचे सेवन करू शकता. पण जास्त वेळ उकळू नका. जर तुम्ही रोज सकाळी दुधात भिजवलेले चिया सीड्स खाल्ले तर ते तुम्हाला दिवसभर ऊर्जावान ठेवते.