अवीट गोडी असणारं जांभूळ हे फळ खाण्यातली मजा काही न्यारीच आहे. त्याचवेळी आरोग्यासाठीही हे फळ अतिशय उपयुक्त आहे. जांभळामुळे पित्त कमी होते. थकवा दूर होतो. शिवाय तहानही भागते.आज आपण पहाणार आहोत जांभळाचे आरोग्यदायी फायदे…
जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो
जांभळामध्ये असलेल्या मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते.
जांभळाच्या फळासोबतच जांभळाच्या बियांची पावडर, जांभळाच्या झाडाची साल, जांभळाचा रस याचाही मधुमेहाच्या उपचारात चांगला उपयोग होतो.
दात व हिरडय़ा कमकुवत झाल्या असतील व त्यातून रक्त येत असेल तर जांभळाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्यात.
मूळव्याधीतून जर रक्त पडत असेल तर रोज दुपारी जेवणानंतर मूठभर जांभळे खावीत किंवा जांभळाचे सरबत, मध घालून प्यावे. हे प्यायल्याने रक्तस्राव थांबतो व शौचास साफ होते.
जांभळाच्या झाडाच्या सालाची आणि बियांची पावडर पोटाच्या विकारावर गुणकारी असते. डायरिया, अपचन, जुलाब यांसारख्या आजारात ती फायदेशीर ठरते.
जांभूळ नैसर्गिकरीत्या रक्त शुद्ध करते. जांभळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह म्हणजेच आर्यन असते. त्यामुळे जांभूळ खाल्ल्यानेही रक्तातील हिमोग्लोबीन वाढते.
जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असते. तसेच खनिजेही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
जांभूळ थंड फळ असल्याने पोटातील आग आणि अपचन यावर उपयोगी असते.जांभळावर सेंधे मीठ टाकून खाल्ल्याने डिहायड्रेशनमध्ये फायदा होतो,
जांभळाचे बीज बारीक करुन दात स्वच्छ केल्याने दात आणि हिरड्यांची समस्या दूर होते.
जांभळाच्या रसामध्ये आंब्याचा रस मिसळून प्यायल्याने हीमोग्लोबीन वाढते. यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.
जांभळामध्ये असलेल्या मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते..
जांभळाच्या फळासोबतच जांभळाच्या बियांची पावडर, जांभळाच्या झाडाची साल, जांभळाचा रस याचाही मधुमेहाच्या उपचारात चांगला उपयोग होतो.
जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असते. तसेच खनिजेही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.